मुंबई/दि.२७ – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मुंबईतील डबेवाले मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुंबईतील या डबेवाल्यांनाच्या मदतीसाठी आ. रोहित पवार सरसावले आहे. पवार डबेवाल्यांसाठी निधी उभारला असून इतर नागरिकांनाही त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे. मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहेत. त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे पाच हजार सदस्य असून, अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा, यासाठी त्यांनी एक निधी उभा केला आहे. आपल्याच परिवारातील घटक असलेल्या या डबेवाल्यांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर संपर्क करावा,‘ असे आवाहन पवार यांनी केले आहे.
मुंबईतील चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहोचवण्याचे काम करणारया डबेवाल्यांचा व्यवसाय मात्र पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे डबेवाले मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. टाळेबंदी लागू होऊन आता तब्बल पाच महिने झाले आहेत. आता तर डबेवाल्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात मुंबईतील डबेवाल्यांच्या अडचणी समजून घेत आ. पवार यांनी मदत निधी उभा केला आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही मदतीचे आवाहन केले आहे.