आज दिनांक 23 सप्टेंबर,2020 रोजी वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) यांच्या आदेशानुसार स्वास्थ अधिक्षक अरुण तिजारे व मा.तहसिलदार श्री भोसले यांच्या उपस्थितीत इर्विन चौक, सुपर हॉस्पिटल,जिल्हधिकारी कार्यालय, कामगार कल्याण, भुमी अभिलेख, आर.टि.ओ. कार्यालय परिसरात कोविड-19 च्या अनुषंगाने दंडात्मक मोहिम राबवून मास्क न लावणेबाबत 35 नागरिकांवर प्रत्येकी 300 रूपये प्रमाणे 10500 रूपये इतका दंड वसुल करण्यात आला. सदर मोहिमेमध्ये जेष्ठ स्वास्थ निरीक्षक व्हि.एस.बुरे, स्वास्थ निरीक्षक व्हि.डि.जेधे, ए.के.गोहर, रोहीत हडाले, सुमित वानखडे, सैय्यद हक्क, मनिष नकवाल, अविनाश फुके, सचिन हानेगावकर, झोन क्र.1,2,5 चे स्वास्थ निरीक्षक उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक स्थळी थुंकण्यावर बंदी, चेह-यावर कायम मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे या बाबींचे पालन व्हावे या करीता उल्लंघन करणा-या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करणे करीता जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरीक्षक, बिटप्यून यांची नेमणुक मा. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशावरुन करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात तसेच राज्यामध्ये प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये अमरावती मनपा क्षेत्रातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक स्थळी थुंकण्यावर बंदी, चेह-यावर कायम मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे. या बाबींचे पालन व्हावे याकरीता उल्लंघन करणा-या व्यक्तींवर दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्याकरीता मा.जिल्हाधिकारी यांचे निर्देश प्राप्त झाले आहे.