मराठी
८ डिसेबर भारत बंद किसान ऋणमुकती दिन समजून जनतेने सहभागी व्हावे – प्रशांत सोनोने
बुलढाणा दि ६ : शेतकरयांच्या संवैधानिक मूलभूत न्याय्य हक्क अधिकारासाठी देशभरातील सुमारे ५०० शेतकरी संघटना, भारताच्या इतिहासात प्रथमच एकत्रित येऊन निकराचा संघर्ष करीत आहेत. केंद्र सरकारने अतिशय अमानुषपने व निर्दयी जालीम उपाया द्वारे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतु जांबाज लढाऊ शेतकर्याच्या एकजूटी पुढे सरकारला माघार घ्यावी लागली.तदनंतर सरकारने शेतकरी संघटनात फूट पाडण्याचा अयशस्वी
प्रयत्न केला.आता चर्चा करण्याच्या बहान्याने केंद्र सरकार वेळ नष्ट करीत आहे.mrp ज्या प्रमाने ग्राहकाचा हक्क आहे तद्वतच MSP शेतकर्यांचा हक्क होय. परंतु भांडवलदारधार्जीने सरकार मात्र या जुल्मी काळया कायद्याद्वारे भारतभरातील शेतकरयांना देशोथडीला लावून,त्यांना भूमिहीन करून आपल्या. भांडवलदार मित्रासाठी वेठबिगार करून त्याच्या दानशील बांधू इच्छिते.या षडयंत्रास ओळखून देशातील तमाम कामगार संघटना, पुरोगामी साहित्य, कला, संस्कृती संघटनानी, कर्मचारी संघटनानी असंघटीत कामगार ,बांधकाम मजूर संघटनानी या आदोलनास जाहीर पाठींबा दिला आहे.अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूनी आपले पद्मविभूषन पुरस्कारासह अन्य पुरस्कार आंदोलनाच्या समर्थनार्थ परतवलेले आहेत.इतकेच नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या बारे वकील संघाने तसेच अनेक हायकोर्टच्या निवृत्त न्यायधीशांनी पाठिबा घोषित केला आहे. एकप्रकारे या आंदोलनाने व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त केले आहे.केवळ भारतातच नव्हे तर कँनडा, ऑष्ट्रेलिया ,यु. के. लंडन मध्ये सुध्दा या आंदोलनाचे लोण पोहचले आहे. अक्षरशः संयुक्त राष्ट्र संघाने(UNO) सुध्दा या आंदोलनाची दखल घेतली आहे. परंतु कार्पोरेट् सशी हितसंबध व सौख्य असलेले हठधर्मी निगरगट्ट सरकार शेतकर्याच्या न्याय्य मागण्या मान्य करीत नसल्याने. ५०० शेतकरी संघटनाचा सहभाग असलेल्या अ. भा. किसान संघर्ष समिती द्वारे दिंनाक ८ डिसेबर रोजीच्या देशव्यापी भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे आव्हान, सत्यशोधक शेतकरी सभा, शेतकरी कामगार पक्ष ,बळीराजा शेतकरी संघटना, विद्रोही सांस्कृतिक चळवळ,संविथान मोर्चा, मुलनिवासी मुक्ति मोर्चा,आदिवासी फासेपारघी विकास संघटना भटके विमुक्त यूथ फ्रण्ट भटका जोशी दोनाली आदि च्या वतीने प्रशांत सोनोने, डॉ, डि. जे. खेडेकर,कॉ.अँड दत्ता भूतेकर ,बिलामतकार दिनकर दाभाडे, दिपू पवार, समाधान गुर्हाळकर, कॉ. बिलावल ,रमेश जोशी, रमेश अवासे,बिस्ना जमरा,,अशोक तायडे,शहजादउल्लाखान,डॉ संतोष हटकर, रामदेव वाघमारे, आकाश भूतेकर आदिंनी केले आहे.तरी अन्नदात्या ,जगाच्या पोषिंद्या
बळीराजाच्या ऋणातून उतराई करण्यासाठी शेतकरी कामगार, युवक महिला, व्यापारी, कर्मचारी, बेरोजगार, शिक्षक,विद्यार्थी बात कर्मचारी तमाम जनतेने या अभूतपूर्व ऐतिहासिक जनआंदोलनात उत्स्फूर्तपने सहभागी होउन हेआंदोलन न भूतो न भविष्यती असे
यशस्वी करावे, व आपला वाटा उचलावा हेच आवाहन व नम्र विनंती