मराठी
पेट्रोल व डिझेलची दरवाढ त्वरित कमी करण्यात यावी
शिवसेना मोर्शी तालुका व शहर, महिला आघाडी व युवा सेनेचे कार्यकर्ते तहसील कार्यालयावर धडकले
मोर्शी/दि.१२ – दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज दि. 12 नोव्हेंबर रोजी शिवसेना मोर्शी तालुका व शहर तसेच महिला आघाडी व युवा सेनेचे कार्यकर्ते तहसील कार्यालयावर येऊन धडकले व त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करून एक लेखी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ होत असून सामान्य माणसाला ही वाढ न परवडणारी असून पेट्रोल व डिझेलची दरवाढ त्वरित कमी करण्यात यावी तथापि केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी दिल्ली येथे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात पाकिस्तान व चीनचा हात असल्याचे दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना कार्यकर्ते आक्रमक होऊन केंद्रीय राज्यमंत्री यांना पदावरून काढण्यात यावे. अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली. दरम्यान एक लेखी निवेदन शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा नगरसेवक रवींद्र गुल्हाने, नगरसेविका सौ. क्रांतीताई चौधरी, (धावडे) पंचायत समिती सदस्य भाऊराव छापाने, शिवसेनेचे शहरप्रमुख घनशाम सिंगरवाडे, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सुरेशचंद्र विटाळकर, रवींद्र बुरंगे, ओंकार काळे, मुन्ना रायचूरा, शेषराव खोडस्कर, ओंकार जोल्हे, सपना खन्ना, शंकर मोरे, अमर नागले, आकाश छापाने, अंकुश राऊत, अभिजीत साउथ, पुष्कर लेकुरवाळे सह शेकडो शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.