पेट्रोलपंपांवर आता कार चार्जिग सुविधा
मुंबई :- मुंबई देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी सरकार 69 हजारांहून अधिक पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) चार्जिंग कियॉक्स बसविण्याचा विचार करीत आहे. याशिवाय सरकारी मालकीच्या तेल कंपन्या ईओ चार्जिंग कियॉक्स बसविण्याचा विचार करीत आहेत. तेल कंपन्यांना लवकरच सरकार तसे आदेश देऊ शकते.
नुकतीच ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत भर्जामंत्री आर. के. सिंह यांनी तेल मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांना सूचना दिली, की पेट्रोल पंपांवर चार्जिंग कियॉस्क बसविण्यात यावेत. याव्यतिरिक्त, फ्रँचाइजी पेट्रोल पंप ऑपरेटरला किमान एक चार्जिंग कियोस्क स्थापित करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. देशातील सर्व पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
काही महिन्यांपूर्वी तेल मंत्रालयाने पेट्रोल पंपसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या मार्गदर्शक सूचनांनुसार नवीन पेट्रोल पंपावर किमान एक पर्यायी इंधन उपलब्ध असणे आवश्यक आहे. सूत्रानुसार, नवीन पेट्रोल पंप मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाहन चार्जिंगची सुविधा पर्यायी इंधन म्हणून प्रदान करीत आहेत. विद्यमान पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंग कियॉस्क स्थापित केले जातील, तेव्हा त्यात मोठा बदल होईल. उद्योगातील लोकांच्या अंदाजानुसार देशात सुमारे 69 हजार पेट्रोल पंप आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंगची सुविधा मिळवून ई-मोबिलिटीला चालना मिळेल. सध्या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे टाळतात.