भोपाळ/दि. १६ – मध्य प्रदेशातील खरगोन येथील मनरेगा जॉबकार्डमध्ये फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. जॉबकार्डवर बॉलिवूड अभिनेत्रीचे फोटो लावले आहेत. पुरुषांच्या जॉबकार्डवर पुरुष लाभार्थीच्या कार्डवर अभिनेत्री दीपिका पादुकोण, अभिनेत्री जॅकलिनची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. जॉबकार्डवर अभिनेत्री आणि मॉडेल्सचे फोटो लावून ती रक्कम काढून घेण्यात आली. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बैनल यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, की दोषींवर आठवड्याभरात कारवाई केली जाईल. गेल्या काही दिवसांत पैसे काढल्याची बाब समोर आली आहे. काही लाभाथ्र्यांनी मनरेगामध्ये काम केले. त्यांना अद्याप पैसे दिले गेले नाहीत. मनरेगा साइटवर जाऊन त्यांनी शोध घेतला, तेव्हा कळले, की त्याची जॉबकार्ड बनावट निघाली. त्यांच्या नावावर अभिनेत्रींचे फोटो चिकटवून त्यांच्या नावावरची रक्कमही काढून घेतली गेली. त्यानंतर लोकांनी आपापल्या जॉबकाड्र्सची झडती घेतली, तेव्हा अशी डझनभरहून अधिक कार्डे सापडली, ज्यात पुरुषांच्या जॉबकार्डवर दीपिका पादुकोण, जॅकलिन फर्नांडिज या अभिनेत्रींची छायाचित्रे चिकटविली गेली होती. मंगत, अनारqसग, सोनू, गोविंदसिंग, पदम qसह यासारख्या अनेक लाभाथ्र्यांची कार्डे येथे सापडली. ज्यांनी आजपर्यंत जॉबकार्ड बनवले नाही, त्यांचीही जॉबकार्ड काढली गेली होती. असाच एक पीडित मुलगा सोनू उर्फ सुनील आहे. त्याने सांगितले, की माझ्याकडे माझे जॉबकार्ड आहे; परंतु माझ्या पत्नीच्या नावावर आणखी बनावट जॉब कार्ड बनवले आहे. मी शोध घेतला असता, दीपिका पादुकोणचा फोटो असल्याचे आढळले. सर्व लोकांनी भ्रष्टाचार केला आहे. आम्हाला एक रुपयाही मिळाला नाही, तर माझ्या नावाने हजारो रुपये काढले गेले. असे अनेक कार्डांबाबत घडले आहे.