वरुड/दि.८ – संत्रानगरी वरुड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नियोजीत जागेत हेतु पुरस्सर नगरपरिषद प्रशासनाने व सत्ताधा:यांनी बदल घडवून आणला आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी नियोजीत करुन दिलेल्याच जागी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात यावा, अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करण्याच्या इशारा मुख्याधिकारी यांना निवेदनातुन देण्यात आला आहे.
शिवसेनेकडुन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, वरुड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापित करण्याकरीता ज्या जागेवर शासनामार्फत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंजूरी देऊन रितसर नकाशा बनवून त्या चौकाच्या सुशोभीकरण संदर्भात नगरपरीषद सभागृहात ठराव सुध्दा घेण्यात आला आहे. मग कोणत्या कारणास्तव यामध्ये बदल घडवून आणला असा मुद्दा शिवसैनिकांनी उपस्थित करुन जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर स्थापीत करण्यात आला नाहीतर शिवसेनेचे सर्व शिवसैनिक शिवसेनेना स्टाईलने आंदोलन करेल. असा इशारा सुध्दा शिवसेनेकडुन निवेदनाद्वारे मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांना देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर माहोरे, योगेश घारड, तालुकाप्रमुख विजय निकम, शहरप्रमुख, लिलाधर बेलसरे, उपतालुका प्रमुख रविंद्र कुबडे, युवासेना प्रमुख धिरज खोडस्कर, मनोज टाकरखेडे, हेमंत मानकर, सुभाष काळबेंडे, प्रविण कडू, राजेश खोडस्कर, लुकेश वंजारी, पकंज चोबितकर, अनिल लोंखडे, सुरेंद्र ठाकरे, लिलाधर सोनुले, अमोल ढोक, कपिल तरार, स्वप्नील डकरे, प्रतिक खेरडे, अंकुश मोघे, निखिल पाटील, शशी खेरडे, नितीन काळे, मधुकर आंडे, महिला शहरप्रमुख सिमा वानखेडे आदी शिवसैनिक उपस्थित होत