महिला राजसत्ता आंदोलनाचे वतीने तालुक्यात कोविड मुक्त ग्रामपंचायतीचे नियोजन
वरुड ता.प्रतिनिधी। ४ ऑक्टो – महिला राजसत्ता आंदोलनाचे वतीने महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने कोविड मुक्त महाराष्ट्रासाठी कोविड मुक्त पंचायत ही प्रतिज्ञा घेण्यात आली.
हा कार्यक्रम युनिसेफ अंतर्गत असुन तालुक्यातील, सावंगा, पिंपळखुटा, बारगाव, बाभुळखेडा, वडंली हे गाव या अभियानात घेण्यात आलेले आहे. या अभियानात पुढे एक वर्ष महिला बालकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा ऑडीट, महिलांचा गावविकास समितीमध्ये सहभाग वाढविणे, गावविकास समित्या बळकट करणे, गरोदर स्तनदा माता यांचे बरोबर संवाद करणे, बचत गटातील महिलांसोबत संवाद करणे, सर्व घटकांचा उपजिविकेचा प्रश्न हाताळणे. आरोग्य कार्यक्रम देखरेख ठेवून समन्वय करणे हा उद्देश जिल्हा समन्वयक रजनी भोंडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून वंडली आणि बाभुळखेडा ग्रामपंचायतमध्ये स्पष्ट केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निलिमा पडोळे, सिमा पडोळे, चारु बहुरुपी, सविता आंडे, मेघा कळसकर, जयश्री निकम, वैशाली बेले, मिना मानकर, मिनाक्षी मानकर, वंदना जिचकार, सिमा भाकरे, मयुरी जिचकार यांनी गाव पातळीवर सहकार्य केले.