सिंगापूर/दि.२६ – फ्युचर-रिलायन्स रिटेल कराराविरूद्ध अॅमेझॉनला अंतरिम दिलासा मिळाला आहे. फ्युचर ग्रुप आपला रिटेल व्यवसाय रिलायन्स रिटेलला २४ हजार ७१३ कोटी रुपयांना विकत आहे; परंतु सिंगापूरच्या एका न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये फ्युचर-रिलायन्स किरकोळ कराराला स्थगिती दिली आहे. कराराचे उल्लंघन केल्याबद्दल अॅवमेझॉनने फ्युचर समूहाच्या किशोर बियाणी यांना सिंगापूर न्यायालयात खेचले. या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये फ्युचर समूहाने रिलायन्सचा रिटेल कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स (RRVL) बरोबर करार केला. रिलायन्सच्या प्रवक्त्याने सांगितले, की आरआरव्हीएलने फ्युचर रिटेल लिमिटेडचा व्यवसाय आणि मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया भारतीय कायद्यानुसार पूर्ण कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच सुरू केली आहे. मागील वर्षी मेझॉनने फ्युचर ग्रुप या अनलिस्टेड यादीतील ४९ टक्के भागभांडवल विकत घेतले. अॅमेझॉनला फ्लॅगशिप फ्युचर रिटेल लिमिटेडमध्ये तीन ते १० वर्षांदरम्यान हिस्सा खरेदी करण्याचा अधिकार आहे, असेही या करारामध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, कर्जबाजारी किशोर बियाणी यांच्या समूहाने नुकताच आपला रिटेल स्टोअर, घाऊक व रसद व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजला विकण्याचा करार केला. हा करार त्या अटीविरुद्ध आहे आणि म्हणूनच मेझॉनने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले, की व्ही.के. राजा यांनी मेझॉनच्या बाजूने निर्णय देताना फ्युचर ग्रुपला हा करार थांबविण्यास सांगितले आहे. या प्रकरणात अंतिम निर्णय होईपर्यंत हा करार करता येणार नाही, असे ते म्हणाले. अॅीमेझॉनच्या प्रवक्त्यानेही या निर्णयाला दुजोरा दिला आहे. प्रवक्त्याने सांगितले, की लवाद कोर्टाने कंपनीला अंतरिम सवलत दिली. तसेच हे प्रकरण लवकरच पूर्ण होईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे. अॅपमेझॉनचा असा विश्वास आहे, की फ्युचर समूहाने रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर करार करून पूर्वीच्या कराराचा भंग केला आहे. जर हा करार झाला तर रिलायन्सला भारताच्या किरकोळ बाजार क्षेत्रातील आपला हिस्सा जवळपास दुप्पट करता येईल. दरम्यान, रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडच्या प्रवक्त्याने आपत्कालीन लवादाच्या अंतरिम आदेशाची माहिती संबंधितांना देण्यात आल्याचे सांगितले.
अंतिम निर्णय तीन महिन्यांत
तीन सदस्यीय लवाद न्यायालय नव्वद दिवसांत या संदर्भात अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. अंतिम निर्णय घेणा-या समितीत फ्युचर आणि अॅ मेझॉन यांनी नामांकित केलेला प्रत्येकी एक सदस्य आणि एक तटस्थ सदस्य असेल. गोपाळ सुब्रमण्यम, गौरव बॅनर्जी, अमित सिब्बल आणि ल्विन येओ यांनी अॅमेझॉनच्या बाजूने काम पाहत आहेत, तर हरीश साळवे हे फ्युचर रिटेलच्या बाजूने काम पाहत आहेत.