मराठी

शिवसेना शहर तर्फे प्रधानमंत्री स्वनिधी योजना नोंदणी अभियान

नगरपथ विक्रेत्यांनी योजनेचा लाभ घ्यावा- खा. भावनाताई गवळी यांचे आवाहन

यवतमाळ दी ७ शिवसेना यवतमाळ शहर तसेच भगतसिंग क्रिडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री स्वनिधी योजना  नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा सह संपर्क प्रमुख संतोष ढवळे तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अभियानाला प्रारंभ
करण्यात आला. दरम्यान शहरातील गरजु नगरपथ विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार भावनाताई गवळी यांनी केले  आहे.
नगरपथविक्रेते  नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. नगरवासियांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे ते स्वस्त दरात वस्तु व सेवांची उपलब्धता
नागरीकांना करुन देतात.  कोविड-१९ (साथीचा रोग)  सर्वत्र पसरलेला असल्यामुळे परिणामी लॉकडाऊन  मध्ये
पथविक्रेत्यांच्या उपजिवविकेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांच्या व्यवसाय पुन्हा प्रस्थापित होण्याकरीता
खेळते भांडवलाचे पतपुरवठा तातडीने करण्याची आवश्यकता आहे.  केन्द्र सरकारने
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेला सुरु केली आहे. कोरोनामुळे रस्त्यावर व्यवसाय करणा-या अनेक व्यावसाईकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे
खासदार भावनाताई गवळी यांनी केंन्द्र सरकारच्या या योजनेची माहिती सर्व छोटया व्यावसाईकांपर्यन्त पोहोचविण्याची तसेच त्यांना मदत करण्याची सुचना शिवसेनेच्या
पदाधिका-यांना दिली आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेचे यवतमाळ शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी व्यावसाईकांना मदत करण्याच्या उद्देशाने भगतसिंग मैदान, गेडाम नगर येथे आजपासून
व्यावसाईकांची नोंदणी सुरु केली आहे. या अभियानाची सुरुवात संतोष ढवळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी सुनिल मेसन, अॅड. राजु काळे,
शौकत अडतिया, महेश गुल्हाणे, यशवंत वैरागडे, गजानन अक्कावार, शाम तिवाडे, संजय कावलकर, दर्शन श्रीवास्तव, अनिल जिरापुरे, लिलाधर दहीकर, बाळासाहेब वाळस्कर,
कंटेश तायडे, भुषण काटकर, गणेश माने, आकाश जाधवर, उरकुडे ताई, यादव ताई, पवन शेन्द्रे उपस्थित होते. या योजनेअंतर्गत दिनांक २४ मार्च २०२० रोजी व त्यापूर्वीचे
पथविक्रेते, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र/ओळखपत्र असलेले पथविक्रेते, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात
आढळलेले परंतु त्यांना विक्री प्रमाणापत्र/ओळखपत्र दिले गेले नाही असे पथविक्रेते, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात जे पथविक्रेते वगळलेले आहेत किंवा ज्यांनी
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरु केली आहे आणि त्यास नागरी स्थानिक किंवा नगर पथ विक्रेता समितीने शिफारस पत्र जारी केले आहे असे पथविक्रेते,
आसपासच्या विकास/पेरी-शहरी/ग्रामीण भागातील पथविक्रेते, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये पथविक्री करतात
आणि त्यास स्थानिक स्वराज्य संस्थेने किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारस पत्र  जारी केले आहे असे पथविक्रेते योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे
आधारकार्ड,  मतदानकार्ड,  बँक पासबुक,  ड्रायव्हिंग लायसन (असल्यास) रेशनकार्ड,  डोमिसाईल प्रमाणपत्र,  पॅनकार्ड,  बाजार फी वसुली पावती
आधारलिंक मोबाइल नंबर,  पासपोर्ट साईज फोटो या सर्व कागदपत्रांसह भगतसिंग मैदान येथे संपर्क करण्याचे आवाहन शिवसेना शहर च्या वतीने करण्यात आले आहे.

  • पथविक्रेत्यांनी योजनेचा लाभ घ्यावा

कोरोना संकटामुळे केन्द्र सरकारने शहरातील पथविक्रेत्यांसाठी स्वनिधी योजना सुरु केली आहे. डबघाईस आलेला स्वताचा व्यवसाय पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी या योजनेचा छोट्या गरजु
व्यावसाईकांना फायदा होणार आहे. त्यामुळे कर्ज स्वरुपात मिळणा-या या निधीचा वापर करुन व्यावसाईकांनी आपला व्यवसाय पुन्हा प्रस्थापित करावा. यामध्ये काही अडचण आल्यास
मदत करण्याच्या सुचना मी शिवसेनेच्या  पदाधिका-यांना दिल्या आहे.

Related Articles

Back to top button