मराठी

प्रकाश काळबांडेंची विजयी घोडदौड

शिक्षकांकडून उदंड प्रतिसाद, विजयासाठी विमाशिने कसली कंबर

अमरावती २९ : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारतोफा आज थंडावल्या असल्या तरीही विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार प्रकाश काळबांडें यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. विमाशिसंघाचे बलाढ्य संघटन तसेच शिक्षकांची ताकद एकत्रित झाल्यामुळे काळबांडे यांचा विजय निश्चित असून त्यासाठी विमाशिने देखील आपली कंबर कसली आहे. विभागातील शिक्षकांचा मोठा प्रतिसाद काळबांडे यांना मिळत असून शिक्षकांनी देखील त्यांच्या विजयाचा संकल्प केलेला आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार प्रकाश काळबांडे यांचा प्रचार दौरा आज जोरात आटोपला आहे. विविध जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रकाश काळबांडे यांच्यासारख्या अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तीमत्वाला विमाशिने दिलेल्या उमेदवारीचे समर्थन करित त्यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. काळबांडे यांच्या शाळा भेटीदरम्यान त्यांना सर्वत्र मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता त्यांच्या मतांमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते. शिक्षकांच्या संघटनेचा उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर उभा असून मला तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे. आज आपल्या शिक्षकांचे अस्तित्व आणि भविष्य दावणीला लागले असून शिक्षण क्षेत्राला वाचवायचे असेल तर विमाशिशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे शिक्षकांनी मला साथ देऊन भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन काळबांडे यांनी यावेळी शिक्षकांना केले. विमाशिसंघाच्या माध्यमातून शिक्षकांच्या अनेक समस्या आजवर निकाली निघाल्या आहेत. विमाशिचे संघटन अमरावती विभागातील शिक्षकांचे सर्वात प्रबळ संघटन असून शिक्षकांचा सुरूवातीपासूनचा कल विमाशिच्याच बाजूने आहे. त्यामुळेच काळबांडे यांना प्रचारादरम्यान सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शिक्षकांनी देखील काळबांडे यांना विजयाचा विश्वास भेटीदरम्यान दिला आहे. गृहभेटीतून शिक्षकांशी साधला संवाद प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रकाश काळबांडे यांनी विविध शाळा तसेच शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिक्षकांनी काळबांडे यांचे स्वागत करून त्यांना विजयी शुभेच्छा देखील प्रदान केल्या. विमाशिसंघाच्या पाठिशी शिक्षकांची ताकद असून काळबांडे यांचाच विजय निश्चित आहे असे शिक्षकांनी यावेळी बोलताना सांगितले. शिक्षक हा माझा जिव्हाळ्याचा विषय असून त्यांच्यासाठी मी आजन्म काम करेल, शिक्षकांच्या समस्या सोडविताना नेहमी सभागृहात सर्वात पुढे मी असेल असेही काळबांडे यांनी शिक्षकांशी बोलताना सांगितले. एकही शाळा विनाअनुदानित दिसणार नाही विनाअनुदानित शाळांना अनुदानाच्या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ सदैव आग्रही आहे. शिक्षकांनाच शिक्षकांच्या व्यथांची जाणीव आहे. त्यामुळे तुमच्या वेदनांची संघटनेला जाणीव आहे. संघटनाच आता शिक्षकांना त्यांचा हक्क मिळवून देऊ शकते. मी आमदार म्हणून सभागृहात निवडून गेल्यास राज्यातील एकही शाळा विनाअनुदानित दिसणार नाही. प्रत्येक शाळेतील शिक्षक वेतन व पेंशनधारक असेल हा माझा शब्द आहे असे काळबांडे यावेळी बोलताना म्हणाले.

Related Articles

Back to top button