मराठी

प्रशांत भूषण यांची शिक्षा लांबणीवर

नवी दिल्ली : २०२० च्या न्यायपालिका अवमान प्रकरणात (2020 Judicial Contempt Case) दोषी ठरलेल्या ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण (Senior Lawyer Prashant Bhushan) यांच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाकडून (The Supreme Court) दिला जाणारा शिक्षेचा निर्णय आज टळला. आता या प्रकरणाची सुनावणी दहा सप्टेंबर रोजी होणार आहे. ‘मत मांडण्याचे स्वातंत्र्य‘ आणि ‘न्यायालयाचा अवमान‘ या दोहींमधील संघर्षावरही मते ऐकण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दाखवली. प्रशांत भूषण यांना शिक्षा सुनावण्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे प्रतिनिधी अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांचे मत विचारात घेतले. तेव्हा वेणुगोपाळ यांनी ‘प्रशांत भूषण यांचे ट्विट न्यायपालिकेत सुधारणेच्या दृष्टीने करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना कोणतीही शिक्षा न देता केवळ इशारा देऊन सोडण्यात यावे,‘ असे म्हटले. यावर न्यायाधीशांनी ‘प्रशांत भूषण यांचे उत्तर पहिल्यापेक्षाही जास्त अपमानकारक आहे,‘ असे म्हटले. ‘चूक सगळ्यांकडून होते; परंतु चूक करणाऱ्याला त्याची जाणीव तरी असायला हवी. आम्ही त्यांना माफी मागण्याची संधी दिली होती; परंतु त्यांनी माफी मागणार नसल्याचे म्हटले‘ असेही न्यायाधीशांनी म्हटले. उल्लेखनीय म्हणजे, आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांचे वकील राजीव धवन यांच्याकडेच भूषण यांना काय शिक्षा द्यायला हवी, असे म्हणत त्यांचा सल्लाही विचारला. यावर वेणुगोपाळ यांनी भूषण यांना इशारा देऊन सोडून द्यायला हवा असा सल्ला दिला; मात्र मी या सल्ल्याशीही सहमत नाही. माझ्या म्हणण्यानुसार, साध्या निवेदनावर भूषण यांना सोडून द्यायला हवे. भूषण यांना आपण कोणतीही चूक केली असे वाटत नसेल तर आमच्या वक्तव्याचा काय परिणाम होईल. ते भविष्यातही अशी वक्तव्य करणार नाहीत हे कसे सुनिश्चित करणार, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. यावर, अ‍ॅटर्नी जनरल यांनी भूषण भविष्यात असे करणार नसल्याचे आश्वासन न्यायालयाला दिले. यावर, ‘ही गोष्ट भूषण यांनी बोलायला हवी. ते जर असे म्हणाले असते, तर प्रकरण खूप सरळ होते; परंतु त्यांनी आपले ट्विट कसे योग्यच होते, हे सांगायला सुरूवात केली,‘ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाकडून टर्नी जनरलची कोंडी.
भूषण यांनी कोणतीही चूक केली नसेल तर त्यांना इशारा कोणत्या गोष्टीसाठी द्यावा, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने (The Supreme Court) केला. भूषण यांच्याविरुद्ध वेणुगोपाळ यांनीच दाखल केलेल्या अवमान याचिकेचाही न्यायालयाने उल्लेख केला. भूषण यांनी वेणुगोपाळ यांच्यावर न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता. वेणुगोपाळ यांनी आपण तो खटला मागे घेतला होता, असे म्हटले. तेव्हा, भूषण यांनी खेद व्यक्त केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध खटला परत घेण्यात आला होता, याची आठवण न्यायालयाने केली.

Related Articles

Back to top button