मराठी

नेपाळच्या पंतप्रधांनांना भारतप्रेमाची उबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी रात्री फोन केला

काठमांडू/दि.१७नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी काही महिन्यांपासून भारतविरोधी वक्तव्य केले होते. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी रात्री फोन केला. १० एप्रिलनंतर दोन्ही नेत्यांनी प्रथमच चर्चा केली. ओली यांनी ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मोदी आणि भारतीय जनतेचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर सहकार्याच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. भारत आणि नेपाळ यांच्यात काही महिन्यांपासून सीमा वादावरून तणाव आहे. नेपाळने गेल्या महिन्यात आपला नवीन नकाशा जाहीर केला होता. यामध्ये भारताच्या भागातील कलापाणी आणि लींपियाधुराला स्वत: चे म्हणून संबोधले होते. ओली यांनी नेपाळध्ये खरी अयोध्या असल्याचा दावा केला होता. ओलीचे परराष्ट्र संबंध सल्लागार रंजन भट्टराई यांनी शनिवारी रात्री माध्यमांना दोन्ही नेत्यांमधील संभाषणाविषयी माहिती दिली. रंजन म्हणाले, की आम्ही नेहमीच संवादाच्या बाजूने होतो. पंतप्रधान ओली यांनी म्हणूनच भारताच्या पंतप्रधानांना फोन केला.

दोन्ही देशांमधील संभाषणात कशी प्रगती होते हे पाहणे बाकी आहे. विशेष बाब म्हणजे याविषयी कोणतीही टिपण्णी भारताने केली नाही. भारत आणि नेपाळ यांच्यात उद्या महत्त्वपूर्ण संवाद होणार आहे. नेपाळमध्ये भारताकडून राबविण्यात येत असलेल्या विकास प्रकल्पांवर चर्चा होईल. बहुतेक प्रकल्प थेट लोकहिताशी संबंधित आहेत. ओली यांच्यावर चीनचा दबाव आहे; मात्र त्यांनी इच्छा असली, तरीही ते भारताद्वारे चालवलेल्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्याच्या स्थितीत नाही. पंतप्रधानपदाच्या भारतविरोधी वक्तव्यासाठी त्यांचा स्वतःचा पक्षच त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे ओलीवर सर्व बाजूंनी दबाव आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ qसह यांनी दोन महिन्यांपूर्वी कालापानी, लिपुलेख आणि लींपियाधुरा जोडणा-या रस्त्याचे उद्घाटन केले, तेव्हा नेपाळने निषेध केला आणि त्यास आपला भाग म्हटले. मागील महिन्यात, हक्काचा दावा करण्यासाठी नेपाळने एक नवीन नकाशा जारी केला. हा भारतात पाठविण्यात आला होता. भारताने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. फक्त सांगितले, की वेळ येईल तेव्हा नेपाळशी चर्चा केली जाईल.

  • ओलींचे धार्मिक कार्डही फ्लॉप

ओलींनी धार्मिक कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. अयोध्याच्या चितवन जिल्ह्यात रामाचा जन्म झाल्याचा दावा केला. अयोध्यापुरी म्हणून या जिल्ह्याचा विकास करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी अधिकारयाना देण्यात आले होते. तसेच राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले. पाच ऑगस्टला मोदींनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले. नेपाळमधील पुजा-यांनीही हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या घरातही ओलींची ही हालचाल फ्लॉप ठरली.

Related Articles

Back to top button