मराठी
कर्मचाऱ्यांना आधी DCPS चे हिशोब द्या-आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे
उपसचिव शालेय शिक्षण यांच्या दालणात बैठक संपन्न
-
शिक्षकांना dspc चा हिशोब मिळेपर्यंत NPS चे खाते न काढण्याचे प्रा.श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन
-
उपसचिव चारुशिला चौधरी यांचे कडे बैठकिला आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रय सावंत व आमदार बाळाराम पाटील उपस्थित
प्रतिनिधी अमरावती : राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीची तारीख 1 सप्टेंबर 2020 हि निश्चित केली आहे त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची नविन अंशदान निवृत्तीवेतन योजनेची खाती राष्ट्रीय निवृत योजनेत समाविष्ट करण्यासाठी कार्यवाही करणेबाबत 28 जुलै 2020 चे परीपत्रकात आयुक्त यांनी दिलेले आहे.त्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनकडून या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नविन निवृत्ती वेतन योजनेची त्यांच्या कपाती संदर्भातील रकमा,शासनाच्या हिश्याची व त्यावरील व्याजाची परीगणना करणे,पोचपावत्या कर्मचाऱ्यांना देणे हे बंधन कारक आहे.परंतू जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिभाषित अशंदान निवृत्ती योजनेचा (DCPS) कोणताही हिशेब न देता त्यांचे राष्ट्रीय निवृत्ती योजनेत समाविष्ट करण्याच्या अगोदर या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कपात झालेल्या रकमा,त्या रकमेवर शासनाकडून मिळालले व्याज त्याची परीगनना करुन कर्मचाऱ्यांना त्यांच्या पोचपावत्या लवकरात लवकर देण्यात याव्या अशी मागणी अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे (Prof. Shrikant Deshpande, MLA of Shikshak constituency) यांनी शालेय शिक्षण उपसचिव चारुशिला चौधरी यांचे कडे मंत्रालयात बैठकी दरम्यान केली या बैठकीला आ.श्रीकांत देशपांडे, आ.दत्तात्रय सावंत व आ बाळाराम पाटील उपस्थित होते. त्याचे फलीत महाराष्ट्र शासनाने 3 सप्टेंबर 2020 ला शिक्षण आयुक्त, संचालक,उपसंचालक यांना आदेशीत करुन दि 20 सप्टेंबर 2020 पर्यंत सर्व अहवाल मागीतला आहे.अशी माहिती स्वीय सहाय्यक रविंद्र सोळंके यांनी दिली..
कर्मचाऱ्यांना जुनीच पेशंन योजना मिळावी या मताचा मी आहे आणी पुढे जुनी पेंशन योजना मी 100% मिळवून देणार.
कर्मचाऱ्यांना त्यांचा (DCPS) चा हिशेब मिळाला नाही अश्या अनेक तक्रारी होत्या यावर मी शासनाशी बैठक घेऊन सर्व प्रकार सांगीतला.त्यावर उपसचिव यांनी आदेश दिले आहे.आता सर्व कर्मचाऱ्यांना (dcps) चा पुर्ण हिशोबासह पावत्या मिळेल.पुर्ण हिशोब मिळेपर्यंत कोणत्यात कर्मचाऱ्यांनी nps ची कार्यवाही करु नये..आ.प्रा.श्रीकांत देशपांडे अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ.