अमरावती/दि. 12 – कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. पिठोरी अमावस्येला (18 ऑगस्ट) पोळा सण साजरा करताना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामूहिक पूजन करण्यात येऊ नये, असा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे.
आपल्या कृषीप्रधान देशात पोळा हा सण अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, कोरोनाची साथ पाहता गर्दी टाळणे सर्वांसाठीच हितावह ठरेल. त्यामुळे सर्वांनी आपल्या घरीच पोळा साजरा करा. कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन श्री. नवाल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.