मराठी

रस्ते, इमारती, पायाभूत सुविधानिर्मितीला चालना

पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांच्याकडून लेहगाव विश्रामगृहाची पाहणी

अमरावती/दि. 21 – पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी शासनाकडून विविध प्रयत्न होत असताना जिल्ह्यातही रस्ते, इमारतींच्या कामांना चालना देण्यात येत आहे. लेहगाव येथील विश्रामगृह 1890 मध्ये निर्माण झाले आहे. त्याचे नुतनीकरण करताना वास्तूचे मूळ रूप राखून आवश्यक त्या सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी आज लेहगाव येथे दिले.पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज मोर्शी तालुक्यातील लेहगाव येथील विश्रामगृहाची पाहणी केली.

रस्तेविकासाबरोबरच नव्या इमारतीची बांधणी व जुन्या वास्तूंचे नुतनीकरणाची अनेक कामे जिल्ह्यात सुरू आहेत. वास्तूंच्या नुतनीकरणात त्यांचे पारंपरिक वैभव जपले जावे, तसेच सगळ्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.

नूतनीकरणाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असले पाहिजे. जिल्ह्यात आवश्यक तिथे नव्या इमारतींच्या कामांना मंजुरी देण्याची व निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गतीने राबवली जात आहे. विकासकामांसाठी जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

Back to top button