वरुड/दि. २२ – गेल्या काही दिवसांपासुन शेंदुरजनाघाट शहरात दुषीत पाण्याचा पुरवठा होत असून यासंदर्भात तातडीने उपाययोजना करुन शहरवासियांची विविध रोगांपासून सुटका करावी अशी मागणी न.प.पाणीपुरवठा सभापती जया श्रीराव यांनी न.प.मुख्याधिकारी यांचेकडे केली आहे.
यासंदर्भात न.प.पाणीपुरवठा सभापती जया श्रीराव यांनी न.प.मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले असून त्यामध्ये शेंदुरजनाघाट शहरात गेल्या २ दिवसांपासून नळाला प्रचंड दुषीत पाणीपुरवठा होत आहे. पुर्ण गावातील काही भागात नळाला येणारे पाणी पतकिरी व लालसर पाणी येथे व संबंधित कर्मचारी यांचे भ्रमणध्वनीवरुन विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात. दुषित पाण्यामुळे शहरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू शकते त्यामुळे संबंधित कर्मचा:यांवर कार्यवाही करण्यात यावी व शहरात शुध्द पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच शहरातील लोकांचे आरोग्य जर या पाण्यामुळे बिघडले तर त्याला शेंदुरजनाघाट नगरपरिषद जबाबदारी राहील, असा इशारा सुध्दा न.प.पाणीपुरवठा सभापती जया श्रीराव यांनी न.प.मुख्याधिकारी यांचेकडे केली आहे.