मराठी

पब्जी गेम पुन्हा भारतात?

‘ब्लूहोल‘ ने 'टेंन्सेन्ट' गेम्सशी फ्रँचायझी करार मोडला

नवीदिल्ली दि/८ – पबजी (PUBG) गेम्स चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतात नुकत्याच बंदी घातलेल्या पब्जी गेमचे पुन्हा भारतात आगमन होण्याची शक्यता आहे.पब्जी गेम्सची निर्मिती करणा-या दक्षिण कोरियन कंपनी ‘ब्लूहोल‘ने चीनी कंपनी टेंन्सेन्ट गेम्सशी केलेला आपला फ्रँचायझी करार मोडला आहे. कंपनीने भारतातील पब्जी गेम्सची फ्रेंचायझी टेंन्सेन्ट गेम्सला दिली होती. ती आता रद्द करण्यात आली आहे. पीयूबीजी कॉर्पोरेशन (PUBG CORP.) आता भारतातील खेळाच्या सर्व जबाबदा-या स्वतःच हाताळणार आहे. ‘पब्ज कॉर्प‘ हा दक्षिण कोरियन कंपनी ब्ल्यूहोलचा(BLUEHOLE) भाग आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर, अशी चर्चा वर्तवली जात आहे, की पब्जी भारतात पुन्हा दाखल होऊ शकेल. देशातील या गेqमगचे चाहते बंदी आणल्याने फार नाराज आहेत. यासंदर्भात, पब्ज कॉर्पोरेशनने म्हटले आहे, की त्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती आहे आणि खेळावरील बंदीमागील कारणांचा शोध घेत आहोत. भारतातील पब्ज मोबाइलचे नियंत्रण यापुढे टेंन्सेन्ट गेम्सच्या ताब्यात राहणार नाही आणि भारतात या खेळाची संपूर्ण जबाबदारी पब्ज कॉर्पोरेशनची असेल. पब्ज कॉर्पोरेशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की पब्ज कॉर्पोरेशन सरकारच्या निर्णायाचे स्वागत करते. वापरकत्र्यांचा डेटा सुरक्षित ठेवणे ही कंपनीची सर्वात मोठी जबाबदारी आहे. कंपनीला भारत सरकारच्या सहकार्याने खेळाडूंसाठी हा खेळ पुन्हा सुरू करायचा आहे. ही कंपनी भारतीय नियमांनुसार खेळ चालवणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. भारतात पब्दी गेमवर बंदी घातल्यानंतर टेंन्सेन्ट गेम्सचे ३४ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. कंपनीचे बाजार मूल्य ३४ अब्ज डॉलर्सने कमी झाले आहे. भारताने ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर एकाच दिवसात हे नुकसान झाले. सर्व ११८ प्रतिबंधित अ‍ॅप्स गुगल प्ले आणि पल अ‍ॅप स्टोअर वरून काढली जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आणि वापरकत्र्यांचा डेटा चोरी टाळण्यासाठी केंद्र सरकारने या अ‍ॅगप्सवर बंदी घातली. सरकारचे म्हणणे आहे, की बंदी घातलेली अ‍ॅप्स भारताच्या सार्वभौमत्वासाठी, अखंडतेसाठी, सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी धोकादायक होती. सरकारच्या या पावलामुळे कोट्यवधी भारतीय मोबाइल आणि इंटरनेट वापरकत्र्यांचा डेटा सुरक्षित राहील.

Related Articles

Back to top button