मराठी

प्रा. डॉ. डी. आर. बांबोळे आणि प्रा. विलास ठाकरे यांच्या पुस्तकांचे थाटामाटात प्रकाशन संपन्न

दर्यापूर दि १२  – श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व्दारा संचालित मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयातील प्रा. डॉ. डी. आर. बांबोळे यांच्या बी. एस्सी. भाग-१ च्या सेमिस्टर-१ व सेमिस्टर – २ या भौतिकशास्त्र विषयाच्या पाठ्य पुस्तकांचे तसेच प्रा. डॉ. डी. आर. बांबोळे आणि प्रा. विलास ठाकरे यांच्या बी. एस्सी. भाग-२ (गृहविज्ञान) सेमिस्टर–३ “संगणकाचे गृह विज्ञानातील उपयोजन” या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा दि. ३०/०३/२०२१ रोजी मा. श्री. हर्षवर्धनजी देशमुख, अध्यक्ष, श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, यांचे हस्ते आणि मा. दिलीपबाबू इंगोले, कोषाध्यक्ष , श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, प्राचार्य, वि. गो. ठाकरे, स्वीकृत कार्यकारी सदस्य, श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माजी अधिष्ठाता, डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. पं. दे. वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती, प्राचार्या, डॉ. संयोगिता एस. देशमुख, प्रा. डॉ. छाया विधळे यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
 या प्रकाशन सोहळ्या करिता मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व माजी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button