मराठी

रेल्वेकडे जमिनीची देखरेखीची यंत्रणाच नाही

१६ पैकी १३ विभागात स्थिती; रेल्वेमार्ग वेढले अतिक्रमणांनी

नवीदिल्ली/दि.१४  –  लोहमार्गाच्या कडेला असलेल्या मौल्यवान जमिनींवर अतिक्रमणे आणि अवैध बांधकामे वाढली आहेत. नेत्यांच्या दबावाखाली अनेक वेळा महानगरपालिका व पोलिस सहकार्य करत नाहीत. बेकायदा बांधकाम थांबविण्याच्या संसदेच्या लोक लेखा समितीच्या अहवालावर नजर टाकल्यास 16 क्षेत्रीय मुख्यालयांपैकी 13 विभागात जमीन देखरेखीची यंत्रणा नियुक्त केली नसल्याचे  आढळले. ज्या तीन झोनमध्ये ही अंमलबजावणी केली गेली, तेथे तैनात असलेल्या कर्मचा-या प्रशिक्षणही मिळाले नाही. या त्रुटी व गैरव्यवस्थेमुळे रेल्वे अतिक्रमण रोखू शकली नाही.

जमीन देखभाल अजूनही मंडल स्तरावर विभागली गेली आहे. याचा समन्वय आणि कृतीवर परिणाम होतो. लखनऊमधील आलमनगर स्थानकाजवळ अतिक्रमण असल्यास लखनऊ रेल्वे विभाग हे काढण्यात असहाय्य आहे. त्याचे कारण चारबाग स्थानकापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर हा परिसर मोरादाबाद रेल्वे विभागात येतो. उत्तर रेल्वे, ईशान्य रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे आणि पूर्व तटीय रेल्वे असे चार झोनचे चार डीआरएम मुख्यालय आहेत तर नऊ रेल्वे विभाग नव्हे तर संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी केंद्रीकृत यंत्रणेची आवश्यकता आहे. अतिक्रमण हटविण्यात अभियंता व रेल्वे राखीव पोलिस अकार्यक्षम आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच लोहमार्गालगतच्या ४८ हजार झोपडपट्ट्या हटविण्याचे आदेश दिले होते. तसेच कोणत्याही सरकारचा दबाव आणि न्यायालयाने स्थगिती देऊ नये, असे म्हटले असताना आता केंद्र सरकारने बोटचेपी भूमिका घेतली आहे.
दिल्लीतील लोहमार्गाच्या बाजूला सध्या 48,000 झोपडपट्ट्या आहेत, त्या हटविल्या जाणार नाहीत, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली.  रेल्वे राखीव पोलिस हे केवळ रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे; परंतु जमीन रेल्वेची आहे, की नाही, हे फक्त अभियांत्रिकी विभागच करू शकतो. देशभरात रेल्वे राखीव पोलिस दलात पाच हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. रेल्वेच्या मालमत्ता रिकाम्या करण्यासाठी रेल्वेच्या अभियांत्रिकी शाखेला सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा लागतो. संबंधित महापालिका व पोलिस व रेल्वे राखीव दलाची अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी आहे. अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमा पुन्हापुन्हा राबवूनही झोपडपट्ट्या पुन्हा पुन्हा होतात. मोकळ्या जागेवर रेल्वेने कुंपण लावल्यास ते ठिकाण सुरक्षित होते. कुंपण घालणे हे अभियांत्रिकीचे काम आहे.

Related Articles

Back to top button