मराठी

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून

नवीदिल्ली/दि. १३ – संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, कोरोनामुळे या अधिवेशनास खासदारांची उपस्थिती कमी असेल, असा अंदाज आहे. हे सत्र अनेक प्रकारे भिन्न आहे. या वेळी संसदेची दोन्ही अधिवेशने वेगवेगळ्या वेळी होणार आहेत. याशिवाय खासदारांना संसदेत अनेक नियम पाळावे लागतात.काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या परदेशी उपचारासाठी गेल्याने त्या काही दिवस संसदेच्या अधिवेशनात भाग घेऊ शकणार नाहीत.
शनिवारी, सोनिया आपल्या वार्षिक वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला रवाना झाल्या. राहुल गांधीही त्यांच्यासोबत गेले आहेत. किमान दोन आठवड्यांनंतर सोनिया देशात परत येण्याची शक्यता आहे; मात्र सोनिया यांना रुग्णालयातच दाखल करून  येत्या काही दिवसांत राहुल परत येईल. राहुल परतल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका वधेरा आपल्या आईची देखभाल करण्यासाठी अमेरिकेला रवाना होतील. काँग्रेसमधील संघटनात्मक फेरबदलाला मान्यता दिल्यानंतर सोनिया परदेशात गेल्या आहेत. पक्षाध्यक्षांच्या अनुपस्थितीत वरिष्ठ नेते पावसाळी अधिवेशनात उपस्थित करावयाचे मुद्दे ठरवतील. कोरोनाच्या आढावा बैठकांसाठीचा सविस्तर प्रोटोकॉल असूनही, बरेच खासदार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गैरहजर राहतील. तृणमूल काँग्रेसच्या सात खासदारांनी संसद अधिवेशनात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यसभेचे मुख्य सचेतक सुखेंद्रू शेखर राय यांचा समावेश आहे. बेळगावचे भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. या व्यतिरिक्त केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना शनिवारी पणजी येथील रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यामुळे हे दोन्ही नेते संसद अधिवेशनात येण्याची शक्यता कमी आहे. त्यांना आणखी काही दिवस विलगीकरणात राहावे लागेल.

पाच खासदार बाधित

या अधिवेशनापूर्वी घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत पाच खासदार कोरोना बाधित आढळले. या अधिवेशनापूर्वी सर्व खासदारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अधिवेशनात कोरोनाबाबतच्या मार्गदर्श सूचनांचे पालन करण्यात येणार आहे. लोकसभेचे कामकाज दररोज चार  तास चालणार आहे, तर शून्यकाल कमी करण्यात आला आहे. प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरुपात देण्यात येणार आहेत. कोरोना संकटाच्या काळात होणाऱ्या अधिवेशनाच स्वरुप वेगळे असणार आहे.

Related Articles

Back to top button