मराठी

राफेलच्या सरावानेचीन-पाकला धडकी

नवी दिल्लीः भारताच्या राफेल विमानांनी युद्धाची तयारी सुरू केलीय. ही विमानं सध्या हिमाचल प्रदेशातील हिमाच्छादीत पर्वत रांगामध्ये रात्रीच्या वेळी सराव करत आहेत. पर्वत रांगेतील हा अभ्यास पूर्व लडाखमध्ये चीन आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानशी सुरू असलेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर लढाऊ विमानांना कामी येणार आहे. हिमालयातील पर्वतरांगांप्रमाणेच हिमाचलमधील स्थिती अधिक मिळती-जुळती आहे. चीनशी सुरू असलेला तणाव चिघळला तर राफेल विमाने आपल्या मेटॉर आणि स्कल्प क्षेणास्त्रांनी हल्ला करण्यास सज्ज आहेत.  हिमाचल प्रदेशात सराव करत असलेली राफेल विमाने सध्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून दूर आहेत. अक्साई चीनमध्ये तैनात असलेल्या चिनी सैन्यचे रडार या विमानांची फ्रिक्वेन्सी सिग्नेचर्स ओळखू शकतात. संकटाच्या स्थितीत चीन या सिग्नेचर्सचा वापर करून विमाने जॅम करू शकतात, तर लडाखमध्येही प्रशिक्षणासाठी राफेल वापरले जाऊ शकते. कराण या विमानांमध्ये सिग्नल प्रोसेसर्स लावण्यात आले आहेत. जे गरज भासल्यास फ्रिक्वेन्सी बदलू शकतात, असे संरक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. हवाई दलाच्या पायलटना हवेतील आणि जमिनीवरील लक्ष्य टिपणे सोपे जाणार आहे.   मेटॉर क्षेपणास्त्र नो इस्केप झोनमध्ये येते, म्हणजे या क्षेपणास्त्रापासून वाचणे शक्य नाही. हवेतून हवेत मारा करणाèया विद्यमान क्षेपणास्त्रांच्या तुलनेत तीनपट अधिक शक्तिशाली आहेत. या क्षेपणास्राला एक रॉकेट मोटर लावण्यात आली आहे. तिची क्षमता १२० किलोमीटरपर्यंत आहे.  भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणाव कायम आहे. दोन्ही देश मुत्सद्दी आणि सैन्य स्तरावर चर्चा करत आहेत. सध्या सैन्यातील तिन्ही दलांचे लक्ष हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पश्चिम सेक्टरसह इतर भागांवरही आहे. पँगाँग आणि डेपसांगमधून चिनी सैन्याने पूर्णपणे मागे हटावे. तरच सीमेवर शांतत प्रस्थापित होऊ शकेल, असे भारताने चीनला ठामपणे सांगितले. गेल्याच आठवड्यात लष्करप्रमुखांनी दौरा करत लष्कराच्या मध्य आणि पूर्व भागातील कमांडर्सना कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. भारतीय नौदलानेही qहद महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्रात कडक पाळत ठेवली आहे.

Related Articles

Back to top button