मराठी

व्याजदरात कपातीचे रिज़र्व बँकेचे संकेत

कोरोना नंतर अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मार्गावर आणणे गरजेचे

नवीदिल्ली/दि.२७ – कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतो आहे. सध्या अनलॉक सुरू झाले असले, तरीही सुरुवातीच्या काळात जवळपास तीन महिने टाळेबंदी होती. संपूर्ण देश घरात बसलेला होता. या काळात व्यवसाय ठप्प झाले. संपूर्ण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. याच पाश्र्वभूमीवर येत्या काळात व्याज दरात आणखी कपात केली जाऊ शकते, असे संकेत रिज़र्व बँकेकडून(Reserve Bank Of India) देण्यात आले आहेत. अर्थव्यवस्था सध्या कोलमडलेली आहे. ही अर्थव्यवस्था पुन्हा बळकट करून मार्गावर आणण्यासाठी सावधानता बाळगून पुढे जावे लागणार आहे, असे मत रिज़र्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले आहे. कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मार्गावर आणणे गरजेचे आहे, असेही शक्तीकांत दास यांनी नमूद केले.
दास म्हणाले, की रिज़र्व बँकेने केलेल्या उपाययोजना या लवकरच हटवल्या जाणार असे कोणीही समजू नये. तसेच बँकिंग क्षेत्र सध्या उत्तम स्थितीमध्ये आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनिकरण हे एक योग्य दिशेत उचलण्यात आलेले पाऊल आहे. ते म्हणाले, की बँकांना सध्याच्या स्थितीत आव्हांनांचा सामना करावा लागणार आहे. आता या आव्हानाचा सामना बँका कशा करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. देशातील कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याच्या अन्य बाबींवर स्पष्टता आल्यानंतर रिज़र्व बँक महागाई आणि आर्थिक वद्धीबाबत आपला अंदाज वर्तवणार असल्याचे दास यांनी सांगितले

Related Articles

Back to top button