प्रत्येक घरात शाैचालयाचे स्वप्न साकार
नवी दिल्ली/दि.२१ – स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भारताला मोठे यश मिळाले आहे. या अंतर्गत देशातील जवळपास प्रत्येक घरात शौचालयाचे स्वप्न साकार झाले आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशातील केवळ चाळीस टक्के लोकांकडे शौचालयाची सुविधा होती. दोन ऑक्टोबर 2014 रोजी त्यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या मोहिमेचा हेतू पुढील पाच वर्षांत खुले शौच थांबविणे आणि मॅन्युअल स्कॅव्हेंगिंग आणि स्वच्छतेचा कल दूर करणे हा होता.
ऑक्टोबर २०२० मध्ये मोदी यांनी अहमदाबाद येथे झालेल्या सभेत जाहीर केले, की भारतात खुल्या जागेवर शाैचाला जाणे आता थांबले आहे. गेल्या पाच वर्षांत देशात 11 कोटी शौचालय बांधली गेली. साठ कोटी लोकांना शौचालयाची सुविधा मिळाली. जर आपण वर्षानुवर्षे डेटाबद्दल बोललो, तर हे यश खूप मोठे आहे. २०१४-मध्ये 43. 4 टक्के लोकांना शौचालयाची सुविधा होती. २०१५-16 मध्ये 51.१4 टक्के लोकांना शौचालयाची सुविधा देण्यात आली. २०१६-17-मध्ये 14 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना शौचालये मिळाली. अशा परिस्थितीत, देशातील 65.4 टक्के लोकांकडे स्वतःची शाैचालये होती. 2018-19 मध्ये 98.5 टक्के लोकांकडे शाैचालये झाली. 2019-20 मध्ये, शंभर टक्के लोकांकडे शौचालये झाली. स्वच्छ भारत मिशनच्या आकडेवारीनुसार दोन ऑक्टोबर 2014 पासून देशात दहा कोटी ७१ लाख १३ हजार 973 शौचालयांची निर्मिती करण्यात आली. सहा लाख तीन हजार 177 गावे खुले शौचमुक्त झाली. त्याचवेळी 706 जिल्हेही हागणदारीमुक्त झाले.
केंद्राने या अभियानाचे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात स्वच्छ भारत ग्रामीण अभियान आहे, ज्याअंतर्गत खेड्यातल्या प्रत्येक घरात शौचालय बनविणे आणि त्यांना मुक्त शौचमुक्त ठेवण्याचे उद्दीष्ट आहे. दुस-या भागात स्वच्छ भारत शहरी अभियान आहे. घरांव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट होते. याव्यतिरिक्त, कचरा व्यवस्थापन करण्याच्या मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले. केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत म्हणाले, की, सहा वर्षांपूर्वी जागतिक शौचालय दिन देशाला घेता येईल, की नाही याची चर्चा झाली; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे जनआंदोलन केले. त्यांच्या प्रेरणेने देशाला खुले शौचमुक्त केले. ते म्हणाले, की आज संपूर्ण देश स्वच्छतागृहे बांधण्याच्या व देशाला स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यामध्ये व्यस्त आहे. या कामात अडीच लाखांहून अधिक सरपंच पूर्ण ताकदीने गुंतले आहेत. शेखावत म्हणाले, की जेव्हा आपण युरोप आणि विकसनशील देशांकडे पाहतो, तेथे कोणतीही घाण दिसून येत नाही, हे केवळ सरकारचे काम नसते, प्रत्येकाचे सहकार्य असते. ओला आणि सुका कचरा विकसित देशांमध्ये स्वतंत्रपणे साठविला जातो. आपल्याला ओला व सुका कचरा स्वतंत्र ठेवण्याची सवय लावावी लागेल, त्यामुळे कच-याची विल्हेवाट लावण्यास मदत होईल.