जिल्हा परिषदेद्वारे समुपदेशनातून अनुकंपा तत्वावरील भरती
अमरावती २५ :- ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांचे पञ क्रमांक अकंपा 2018/प्र.क्र.173/आस्था-8/ दिनांक 28.9.2018 चे शासन पञान्वये शासनाने सरळसेवेने भरतीयोग्य घोषीत केलेल्या रिक्त पदांच्या 10% पदे ही अनुकंपा तत्वावर भरण्याबाबत निर्देश असल्याने त्यानुसार दिनांक 31.12.2019 रोजीचे रिक्त पदांच्या स्थितीवर यापुर्वी राबविण्यात आलेली आहे.
शासन निर्णय दिनांक 11.09.2019 अन्वये अनुकंपा नियुक्तीच्या भरतीसाठी असलेली 10% व 20% ची मार्यादा शिथील करुन, वित्त विभागाचे ज्या पदांच्या भरतीवर निर्बाध आहेत आणि ज्या पदांच्या भरतीवर निर्बंध नाहीत अशा सरळसेवेच्या कोट्यातील सर्व पदांच्या बाबतीत, गट-क व गट-ड मधील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 20% पदे अनुकंपा नियुक्तीव्दारे भरण्यात निर्देश असल्याने उप सचिव ग्रा.वि.वि. पञ क्र.संकीर्ण 2018/प्र.क्र.173/आस्था8 दि. 05.2.2020. चे शासन पञानुसार उर्वरीत 10 टक्के उमेदवारांची अनुकंपा पदभरती ही दिनांक 01 मार्च, 2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली जाहीरातीतील पदांमधुन करण्याबाबत निर्देश आहे. उमेदवारांचे शैक्षणिक पाञता जातीनिहाय आरक्षण व बिंदु नामावलीतील रिक्त पदे विचारात घेऊन अनुंपा धारकांची दिनांक 1.3.2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरातीतील पदांवर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यानुसार अनुकंपा पदभरतीची प्रक्रिया सुरु असतांना महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक :अर्थसं-2020/प्र.क्र.65/अर्थ-6 दिनांक 4 मे, 2020 चे शासन निर्णयातील 14 अन्वये सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करु नये असे निर्देश होते. प्रकरणी अनुकंपा पदभरतीची कार्यवाही प्रस्तावित असल्याने शासनास या कार्यालयाचे या कार्यालयाचे पञ क्र.जिपअ/साप्रवि/आस्था-2/6043/2020 दि. 14.07.2020 पञान्वये मार्गदर्शन मागविण्यात आले. संदर्भ क्र. 8 नुसार दिनांक 4 मे, 2020 चे शासन निर्णयातील परिच्देद क्रमांक 14 मध्ये “सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्र.अकंपा-1219/प्र.क्र.56/आठ, दि. 11 सप्टेंबर, 2019 नुसार केल्या जाणाऱ्या अनुकंपा तत्वावरील भरतीस सदरचे निर्बंध लागु राहणार नाही.” असा समावेश करण्यात आला आहे.
अनुकंपा पदभतीची कार्यवाही सुरु असतांना दिनांक 1.1.2020 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या अनुकंपा प्रतिक्षायादीतील दिनांक 9 व 10 जुलै, 2020, दि. 29.6.2020, दि. 17.7.2020 व दि. 1.8.2020 रोजी अनुक्रमे 43, 7, 10 व 4 अनुकंपा धारकांची सुनावणी घेऊन त्यातील 38 अनुकंपा धारकांना अपाञ ठरविण्यात आले. तसेच एकुण 221 उमेदवारांना पाञ ठरविण्यात आले आहे.
पाञ उमेदवारांपैकी एकुण 193 उमेदवारांचे दुरध्वनी क्रमांक प्राप्त असल्याने त्यांचेशी संपर्क करुन त्यांच्या अनुकंपा प्रतिक्षासुचिमध्ये अद्यावतीकरण करणेबाबत सुचित करुन या कार्यालयास व्हाट्सअप , ई-मेल वा प्रत्यक्षरिक्त माहिती सादर करणेबाबत निर्देशीत करण्यात आले. व ज्यांचे फोन नंबर या कार्यालयास प्राप्त नाही त्यांना अनुकंपा धारकांचे व्हाट्सअप ग्रुपव्दारे व ईतर अनुकंपा धारकांव्दारे माहिती सादर करणेबाबत व अद्यावत करणेबाबत निर्देश देण्यात आले. त्यानुसार त्यांनी वेळोवेळी दिलेल्या माहितीच्या आधारे कागदपञांची छाननी व तपासणी करुन दि. 14.7.2020, दि. 7.8.2020 व दिनांक 25.8.2020 रोजी अद्यावत अनुकंपा प्रतिक्षा सुचि प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रकरणी सदर अनुकंपा भरतीप्रक्रिया पुर्ण करणेबाबत शासन स्तरावरुन निर्देश असल्याने कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संक्रमण टाळण्यासाठी दिनांक 25.8.2020 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रतिक्षा सुचिमधील पात्र अनुकंपा धारकांची दस्तऐवज पडताळणीची प्रक्रिया झुम व्दारे आयोजीत करण्यात येत आहे.
यासोबत दिलेल्या वेळापञकानुसार करावयाची असल्याने आपणास झुम वापरतांना येणाऱ्या तांञीक अडचणींचे निराकरन करुन मार्गदर्शन करणेकरीता व दस्तऐवजांची तपासणी करणेकरीता दिनांक 27.08.2020 रोजी प्रात्यक्षिक स्वरुपात रंगीत तालीम घेण्यात येत आहे. व त्यानुसार दिनांक 29.08.2020 रोजी समुपदेशनाव्दारे अनुकंपा पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.