प्रभाग क्रमांक ९ मध्ये पाणीपुरवठा नियमित करा
अन्यथा नगरसेविका अर्चना आजनकर यांचा उपोषणाचा इशारा
वरुड/दि. १९ – प्रभाग क्रमांक ९ मध्ये पाणीपुरवठा नियमित करावा, अशी मागणी करणारे निवेदन नगरसेविका अर्चना आजनकर यांनी न.प.मुख्याधिका:यांकडे केली.
या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, माझे प्रभागामध्ये बहुतांश भागामध्ये गेल्या ३ वर्षापासुन नळाचे पाण्याचा पाणीपुरवठा हा अनियमित हो असतो. याबाबात मी नगर परिषद पाणीपुरवठा विभागचे अभियंता यांना वारंवार तोंडी सांगितले. मात्र नियमित करुन देतो असेच सांगण्यात आले. त्यामध्ये १ टक्के सुद्धा सुधारणा झाली नाही तसेच प्रभागातील नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रार सुद्धा केल्या.
आपण चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करत असतो. तो पण अनियमित माझे प्रभागामध्ये बहुतांश मजुर वर्ग आहे. त्यांना त्यांचे काम सोडुन दिवस दिवसभर नळाची वाट पाहावी लागते. कधी सकाळी ११ वाजता, तर कधी दुपारी २ वाजता तर कधी दुपारी ४ वाजता नळाच्या पाण्याचे आगमन होते. याबाबत नगराध्यक्षांना सुद्धा सांगितले मात्र त्यांनी सुद्धा याबाबीकडे दुर्लक्ष केले.
त्यामुळे माझे अर्जाचा विचार करुन येत्या ८ दिवसात पाणीपुरवठा नियमित अन्यथा मला नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा सुध्दा अर्चना आजनकर यांनी दिला आहे.