मराठी

विद्यार्थी विकास विभाग निर्मित ‘सॉफ्ट 10’ ई बूकचे विमोचन

कुलगुरूंचे हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वावर कार्यक्रम संम्पन्न

अमरावती – विद्याथ्र्यांच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक सोबतच सांस्कृतिक किंवा कलात्मक गुणांचा आणि कौशल्याचा विकास घडवून आणण्यासाठी विद्यार्थी विकास विभाग निर्मित ‘सॉफ्ट 10’ ई बूकचे महत्व अधिक असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले.  जीवन कौशल्य विद्याथ्र्यांना शिक्षण घेत असतांनाच प्राप्त व्हावे, हा महत्तम उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी विकास विभागाने ‘सॉफ्ट 10’ ई बूकची निर्मिती केली आहे.  त्याचा फायदा विद्याथ्र्यांना निश्चितच होणार असून शिक्षकांना सुद्धा वारंवार प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.  विद्यापीठ संकेतस्थळावर अधिकृत प्रशिक्षकांची यादी उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांच्यामार्फत अनेक विद्याथ्र्यांना मार्गदर्शन मिळत आहे, ही निश्चितच मोठी उपलब्धी विद्याथ्र्यांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन आपले विद्यार्थी जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मागे राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.  विद्याथ्र्यांना जीवन कौशल्याचे ज्ञान मिळावे, यासाठी चाळीस प्राध्यापकांनी सातत्याने अथक परिश्रम घेवून ‘सॉफ्ट 10’ ई बूकच्या निर्मितीमध्ये सहभाग दिला आहे.  त्यात दहा मुख्य विषयांवर आधारित त्रेचाळीस धड्यांचा समावेश आहे.  याप्रसंगी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अविनाश मोहरील, बायोटेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी डॉ. पंकजा इंगळे व डॉ. पवन देशमुख निर्मित चित्रफित सादर करण्यात आली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिनेश सातंगे यांनी केले.  संचालन विद्यार्थी विकास जिल्हा समन्वयक डॉ. रेखा मग्गीरवार यांनी, तर आभार राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व रोजगार विभागाचे अधिष्ठाता डॉ. पवन देशमुख यांनी मानले.  डॉ. दिनेश खेडकर व डॉ. मंगेश अडगोकर यांनी तांत्रिक सहाय्य केले.  कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमावर आधारित लेखन साहित्याचा विद्याथ्र्यांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. दिनेश सातंगे यांनी केले.

Related Articles

Back to top button