मराठी

‘रिलायन्स‘ चे ऑनलाईन औषध उद्योगात पदार्पण

६२० कोटींना खरेदी केला नेटमिडस्मधील साठ टक्के हिस्सा

मुंबई/दि. १९ रिलायन्स रिटेलने ऑनलाईन फार्मसी व्यवसायात प्रवेश केला आहे. यासाठी कंपनीने नेटमिड्समधील ६० टक्के हिस्सा ६२० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला आहे. सर्वांना डिजिटल सुविधा देण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीच्या संचालक ईशा अंबानी यांनी म्हटले आहे. या अधिग्रहणानंतर ‘रिलायन्स इंडस्ट्रीज‘ ने टाळेबंदीनंतर मोठी कामगिरी केली आहे. रिलायन्सच्या करारामागील हेतू ई-कॉमर्स क्षेत्रात आपला दबदबा वाढविण्याचा आहे.

या करारासाठी नेटमेडस्चे मूल्यांकन एक हजार कोटी रुपये केले गेले आहे. कंपनी आधीपासूनच ‘जिओ मार्ट‘ च्या माध्यमातून ऑनलाईन किराणा विकत होती. या अधिग्रहणानंतर, भारतातील सर्वांत मोठ्या ‘रिलायसन्स इंडस्ट्रीज‘ ने थेट ई-कॉमर्स राक्षस मेझॉनशी स्पर्धा केली आहे. प्रदीप दाधा यांनी स्थापन केलेली नेटमिडस् ऑनलाईन औषधे, वैयक्तिक आणि देखभाल उत्पादने पुरवतात. या व्यतिरिक्त ही कंपनी आपल्या वेबसाइटद्वारे डॉक्टरांची बुqकग व डायग्नॉस्टिक सेवादेखील पुरवते. निधी उभारणीच्या प्रयत्नांना अपयशी ठरल्यानंतर कंपनी खरेदीदाराचा शोध घेत होती. रिलायन्स ने आता त्यात गुंतवणूक केली आहे.

Related Articles

Back to top button