मराठी

आदिवासी बांधवांसाठी मेळघाटात मदत साहित्य रवाना

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखविली हिरवी झेंडी

नागपूर /२९कोरोनाच्या काळात संचारबंदी असल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यामुळे समाजातील सर्वच घटकांची अडचण होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेळघाट येथील आदिवासी बांधवांसाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला समाजातील अनेक मान्यवरांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. नितीन गडकरी यांच्या आवाहनानुसार एक ट्रकभर मदत सामग्री जमा झाली.
सामुग्रीचा ट्रक आज आदिवासींसाठी मेळघाट येथे रवाना करण्यात आला. त्यापूर्वी नितीन गडकरी यांनी या ट्रकला हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष व आ. प्रवीण दटके, मुन्ना यादव, किशोर वानखेडे व अन्य उपस्थित होते.संचारबंदीमुळे आदिवासी भागात कोणत्याच सुविधा पोहाचू शकल्या नाहीत. आवागमनही बंद असल्यामुळे आदिवासी भागाचा शहराशी संपर्कच तुटला. परिणामी त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यापासून वंचित राहावे लागले. शहरवासियांपेक्षाही आदिवासी क्षेत्रातील लोकांची स्थिती अत्यंत बिकट आहे. अशा स्थितीत त्यांनाही मदतीचा हात देऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचा लहानसा प्रयत्न सामाजिक जबाबदारी समजून व सामाजिक जाणिवेचे भान ठेवत आपणा सर्वांना करायचे आहे, असे आवाहन गडकरी यांनी केले होते. नितीन गडकरी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी आपल्या घरी सुस्थितीत असलेले जुने कपडे, जुने जोडे चप्पल, आपल्याला अनावश्यक असलेली भांडी, आदिवासींना देण्यासाठी ना. गडकरी यांच्या रामनगर येथील कार्यालयात जमा केले. जमा झालेली ही मदत आज मेळघाट येथे पाठविण्यात आली. या मदतीच्या ट्रकला नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

Related Articles

Back to top button