मराठी

वर्ग 5 वी चे वर्ग तोडणारा अन्यायकारक शासननिर्णय रद्द करा

वेळ पडल्यास शिक्षक आमदार रस्यावर उतरणार असल्याचा दिला शासनाला इशारा

अमरावती/दि. २० –  दि.१६ सप्टेंबर २०२० चा इ ५ वी चे वर्ग स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळेस जोडणे बाबतचा शासन आदेश रद्द करावा या साठी अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षणमंत्री ना प्रा वर्षाताई गायकवाड व शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे कडे केली.
   राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवीचे वर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत जोडणे बाबतचा दिनांक 16 सप्टेंबर 2020 रोजी शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन आदेशामुळे राज्यात मोठा असंतोष निर्माण झालेला आहे.सदर शासन आदेशामुळे अनेक खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांच्यावर अन्याय होणार आहे.सदर शासन आदेशामुळे खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील संपूर्णपणे बिंदू संवर्गात बदल होणार आहे.तसेच त्याचा सर्वात मोठा फटका विनाअनुदानित तसेच अंशत अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना होणार आहे त्यामुळे सदर शासन आदेश रद्द करणे बाबत शिक्षक व शिक्षक   संघटना यांच्याकडून मागणी होत आहे असे आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार बाळाराम पाटील व आमदार दत्तात्रय सावंत यांनी शिक्षणमंत्री ना प्रा वर्षाताई गायकवाड व शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे कडे निवेदनातून प्रत्यक्ष भेट घेऊन केली असे स्वीय सहाय्यक रविंद्र सोळंके यांनी कळविले.
   सदर शासन आदेशान्वये इयत्ता ५ वी चा वर्ग जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेला  जोडला तर शाळेत पाचवीचा वर्ग खोली बांधणे गरजेचे आहे त्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण शासनावर येणार आहे तरी वरील सर्व बाबींचा विचार करता सदर शासन आदेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षणमंत्री ना प्रा वर्षाताई गायकवाड व शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे कडे केली.शासन निर्णय रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरु असे आमदार श्रीकांत देशपांडे,आमदार बाळाराम पाटील व आमदार दत्तात्रय सावंत यांनी शिक्षणमंत्री वर्षाजी गायकवाड व शासनाला सांगीतले असल्याचे स्वीय सहाय्यक रविंद्र सोळंके यांनी कळविले.

Related Articles

Back to top button