मराठी
कोब्रा नाग पकडण्यासाठी सर्प मित्राचे रेस्क्यू ऑपरेशन
सर्पमित्र अनिकेत वानखेडे व शुभम विघे ने काढले नागाला
टाकरखेडा संभू वार्ताहर/ २३ ऑगस्ट : येथील रहिवासी वृजेश विजय सवाई यांच्या घरच्या विहिरीमध्ये साडेपाच ते सहा फुटाचा कोब्रा गवार नावाचा मोठा नाग गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांच्या निदर्शनास येत असताना शनिवारी याची माहिती सर्पमित्र अनिकेत वानखेडे व शुभम विघे यांना देण्यात आली. दोन्ही सर्पमित्र गावात दाखल होऊन त्यांनी विहिरीच्या मशीनवर फणा काढून बसलेल्या या नागाला शिताफीने बाहेर काढले. येथे आढळून आलेला हा इंडियन कोब्रा हा सर्प भारतामध्ये नाग नावाने ओळखला जातो. हा नाग अत्यंत विषारी असून इतर सापांच्या तुलनेत खतरनाक आहे. जंगलात नदीच्या किनारी व शेतामध्ये सर्वसाधारणपणे हा नाग आढळून येतो. सरपटणारे जीवजंतू यांना तो आपली शिकार बनवतो. या कोब्रा नागाची हिंदू धर्मामध्ये पूजा केली जाते, त्यामुळे टाकरखेडा संभु येथे आढळून आलेल्या नागाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सर्पमित्राने राबवलेल्या रेस्क्यू अंतर्गत या नागाला अखेर पकडून जंगलात सोडून देण्यात आले.