मराठी

हॉस्पिटल मध्ये बेड राखीव ठेवा, पत्रकार संघाचे जिल्हाधीकाऱ्यांना निवेदन   

जिल्ह्यातील पत्रकारांची गैरसोय होणार नाही - जिल्हाधिकारी पापळकर

अकोला दी ७ – राज्यावर कोरोनाचे संकट अधिक तीव्र होत असतांना देखील पत्रकारांचे कर्तव्य अहोरात्र सुरू आहे. अशा परिस्थितीत संभाव्य कोविड बाधित पत्रकारांसाठी सर्व  खाजगी व शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये बेड राखीव ठेवणे गरजेचे आहे. या मागणीसाठी सोमवारी अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघाचे वतीने निवेदन देण्यात आले.  पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा  कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला.त्यांना हॉस्पिटल मध्ये वेळीच बेड आणि उपचार मिळाले असते तर होतकरू पत्रकाराचा जीव वाचला असता. स्व. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना शासनाने मदत करावी, अशी मागणी या निवेदनातुन करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील  संभाव्य कोविड  बाधित पत्रकारांसाठी हॉस्पिटल मध्ये राखीव बेडची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी यावेळी अकोला जिल्हा पत्रकार  संघाच्या पदाधिकाNयांनी कोविड विषयानुरूप सविस्तर चर्चा केली. अकोला जिल्ह्यातील  संभाव्य कोविड बाधित पत्रकारांची कुठलीही गैरसोय होणार नाही. जिल्ह्यातील पत्रकारांना बेड व उत्तम उपचाराची सुविधा मिळेल असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी निवेदन देतांना मराठी पत्रकार परिषदेचे  माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजूरकर, चिटणीस संजय खांडेकर, दीपक देशपांडे, उमेश अलोणे, धनंजय साबळे, जावेद जकरिया, रामविलास शुक्ला, कमल शर्मा, मनीष खर्चे  आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button