मराठी

शेवटच्या क्षणीही आरक्षित जागा मिळणार

रेल्वेने नियमात केले बदल

मुंबई/ दि,७  – नव्या नियमानुसार आता ट्रेन सुरू होण्याच्या पाच मिनिटे अगोदर आरक्षित जागांचा तपशील उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे ऐनवेळी तिकिटे काढणा-यांनाही जागा उपलब्ध होतील. या दिवाळी किंवा छठपूजेला घरी जाणा-यांना आता ऐनवेळी बसण्यासाठी जागा उपलब्ध होतील.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (RRCTC) तिकिट बुकिंगसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या नियमानुसार आता ट्रेन सुरू होण्याच्या पाच मिनिटांपूर्वीच जागा उपलब्ध होणार आहेत. रेल्वे सुटण्याच्या अर्धा तास अगोर रेल्वे दुसरा चार्ट तयार करणार आहे. जेणेकरून शेवटच्या क्षणी जागा रिक्त झाल्यावर काही लोकांना जागा वाटप करता येतील आणि प्रवास करता येईल. गेल्या काही महिन्यांत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आरक्षणाचा चार्ट दोन तास अगोदर केला जात होता. तिकिट रद्द केल्यास परतावा देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की, रेल्वे सुरू होण्यापूर्वी दुसरा आरक्षण चार्ट अर्धा तास अगोदर जारी केला जाऊ शकतो. या वेळी ट्रेनचे तिकीट रद्द केल्यास परतावा मिळेल. ज्या प्रवाशांचा बेत शेवटच्या क्षणी रद्द होतो आणि शेवटच्या क्षणी रेल्वेचे तिकिट रद्द करावे लागते, अशा प्रवाशांना यामुळे दिलासा मिळेल.
आयआरसीटीसीच्या उर्वरित ऑनलाईन बुकिंग नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीच्या नियमानुसार प्रवाशांना दोन तास अगोदर रेल्वे स्टेशनवर पोहोचावे लागत होते. आयआरसीटीसी ट्रेन सुरू होण्याच्या काही तास अगोदर पहिला चार्ट रिलीज करायची. उर्वरित जागांसाठी तिकिटे काउंटरद्वारे बुक करता येत होती. अर्ध्या तासापूर्वीही काउंटरवरुन तिकिटे उपलब्ध होत होती. दुसरा चार्ट तयार होण्यापूर्वी तिकिट बुकिंग ऑनलाईनही करता येणार होते. या जागा पहिल्या येणा-या पहिल्या तत्वावर उपलब्ध होत्या. आता रेल्वेच्या सर्व झोनमध्ये, रेल्वे सुरू होण्याच्या अर्धा तासापूर्वी दुसरा आरक्षण चार्ट जाहीर केला जाईल.

 

Related Articles

Back to top button