मराठी
विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न त्वरित निकाली काढा – प्राचार्य डाॅ.निलेश गावंडे
ना. बाळासाहेब थोरात यांच्या समोर मांडली विनाअनुदानित शिक्षकांची व्यथा
अमरावती/ दि. १३ – गेल्या पंधरा – वीस वर्षांपासून शासनाने विनाअनुदानित शाळा महाविद्यालयात विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना केवळ आश्वासनेच दिली असून आता तरी विना अनुदानित शिक्षकांच्या वेतनाच्या निधी वितरणाचा आदेश शासनाने काढावा अशी विनंती महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी मा. ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.
शासनाने विनाअनुदानित शिक्षकांच्या निधी वितरणाचा अभ्यास करण्यासंदर्भात मा. ना. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती स्थापन केली आहे. दि. 12 सप्टेंबर रोजी मा.विजय अंभोरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती व जमाती विभागाचे अध्यक्ष व महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी संगमनेर येथे ना. बाळासाहेब थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेतली. तब्बल एक तासाच्या या भेटीत अघोषीत शाळा ,महाविद्यालय तसेच विविध स्तरांवर प्रलंबित प्रस्तावांची 31 ऑगस्टपर्यंत माहिती बोलवली असून शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचा निश्चितच सकारात्मक बाजुने विचार करू असे आश्वासन मा.थोरात साहेब यांनी दिले.
या प्रसंगी विनाअनुदानित शिक्षक गेल्या 15 वर्षापासुन विनावेतन काम करीत असून विनाअनुदानित शिक्षकांची सपुर्ण व्यथाच उपसमितीचे अध्यक्ष मा.ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे मांडली. लवकरात लवकर विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनाचा निधी वितरणाचा आदेश त्वरित काढण्यात यावा अशी विनंती याप्रसंगी करण्यात आली. मा. विजय अंभोरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती व जमाती विभाग यांनी सुध्दा अघोषीत व घोषित ह्या परिस्थितीत कोणताही शिक्षक हा वेतना पासुन राहु नये मा. बाळासाहेब थोरात ह्यांनी पालकत्वाची भुमिका स्वीकारून वंचित शिक्षकांना न्याय द्यावा अशी विनंती केली.
याप्रसंगी ना. बाळासाहेब थोरात यांनी शिक्षकांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.