मराठी

टायफाईड साथीच्या प्रसाराला आळा घाला

काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्याधिका:यांकडे मागणी

वरुड/दि. २२ – येथुन जवळच असलेल्या शेंदुरजनाघाट शहरामध्ये योग्य ती उपाययोजना करुन टायफाईड साथीच्या प्रसाराला आळा घालावा, अशी मागणी करणारे निवेदन शेंदुरजनाघाट शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्याधिकारी यांना केले आहे.
या निवेदनात नमुद करण्यात आले, गावामध्ये टायफाईडच्या साथीचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे आणि नगरपरिषद प्रशासनाचे त्यावर दुर्लक्ष होत आहे. नगरपरिषदेचा पाणीपुरवठा दोन दिवसानंतर होत असुन सुद्धा आपल्या नगरपरिषदेमार्फत अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्यामुळे टायफाईडची साथ फोफावत आहे. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा, फवारणी आणि साफसफाई यावर जातीने लक्ष पुरवावे आणि पाण्याच्या सॅम्पलचे नगरपरिषदेने परीक्षण करावे व नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा सुनिश्चित करावा, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा शेंदुरजनाघाट शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष शेख नासीर शेख बशीर यांनी दिला आहे.

Back to top button