मराठी

सेवानिवृत्तीनिमित्य शिक्षक अरुण वानखडे यांचा सत्कार

अजाबराव काळे पाटील विद्यालयाने दिला निरोप

अमरावती/प्रतिनिधी दि.६ :- पंचवीस वर्षांच्या ज्ञानदानाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले शिक्षक अरुण वानखडे यांना स्वातंत्र्यवीर अजाबराब काळे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चुरणी येथे शिक्षकांच्या वतीने निरोप देण्यात आला.प्रसंगी अरुण वानखडे यांचा सपत्नीक शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.प्राचार्य रवींद्र लहाने यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
३१ ऑगस्ट रोजी शिक्षक अरुण वानखडे यांच्या सेवानिवृत्ती निमित्य स्वातंत्र्यवीर अजाबराव काळे पाटील विद्यालय चुरणी येथे विशेष सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य
रवींद्र लहाने, अरुण वानखडे व पद्मा वानखडे विचारपिठावर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने अरुण वानखडे यांचा सपत्नीक शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
आपण खूप नशीबवान आहोत कारण याठिकाणी मला संस्थेचे अध्यक्ष ,सचिव ,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आजवर भरभरून प्रेम दिले. सदैव मला सर्वांनी सहकार्य करीत या संस्थेमध्ये सामावून घेतले. आज निरोप घेतांना मन गरीवरून गेले आहे अश्या शब्दात अरुण वानखडे यांनी सत्काराला प्रत्युत्तर देतांना म्हटले. अनेक शिक्षक सहकाऱ्यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकुमार देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद घोम यांनी केले.
कार्यक्रमाला किशोर बोकडे,प्रमोद मुंदाने,रमेश धोटे, सुनिल भाष्कर,सुरेश चौधरी, संजय काळे,देवेंद्र भोरे, भिमराव खंडारे,दिपक घोम, संदिप अलोकार, वासुदेव अलोकार,अरुण भामोद्रे,जोगी बेठेकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आभार अरविंद घोम यांनी मानले.

Related Articles

Back to top button