मराठी

आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला आढावा

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा

वरुड/ दि.२३ – अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तहसील कार्यालयात नुकताच आढावा घेतला तसेच कृषि योजनांबाबत माहिती जाणून घेतली.यावेळी उपस्थित अधिका:यांना योग्य त्या सुचना सुद्धा दिल्या.
जून-ऑगस्ट २०२० या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या तालुक्यातील गावांतील पीक नुकसानीचा आढावा घेतला तसेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना (पोकरा), कृषि योजना, औजार यंत्र योजना इत्यादी बाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय कृषि अधिकारी राहुल सातपुते, तहसिलदार किशोर गावंडे, तालुका कृषि अधिकारी सातदिवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद उर्फ बाळू कोहळे पाटील, रामचंद्र राऊत, संदीप खडसे, ऋषिकेश राऊत, गौरव गणोरकर,भूषण चौधरी, शुभम श्रीराव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button