कच्च्या तेलाच्या दरवाढीने इथेनॉलच्या मागणीत वाढ
मुंबई/दि.9 – कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे इथेनॉल उत्पादक साखर कारखान्यांना फायदा होत आहे. मिश्रण करण्यासाठी इथेनॉलची मागणी गेल्या तीन महिन्यांत वेगानेवाढली आहे. तेल विपणन कंपन्या मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 65 टक्केअधिक इथेनॉल खरेदी करतील.
इथेनॉल बनवणार्या कंपन्यांना कच्च्या तेलातील दरवाढीचा फायदा होत आहे. इथेनॉलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तेल विपणन कंपन्यांनी इथेनॉल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी तेल विपणन कंपन्या 283 कोटी लिटर इथेनॉल खरेदी करतील. मागील वर्षी कंपन्यांनी 167 कोटी लिटर इथेनॉल खरेदी केले होते. मागील वर्षाच्या तुलनेत ते 65 टक्के जास्त आहे. सरकारने यापूर्वी दहा टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यास मान्यता दिली आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने 418 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या नवीन प्रकल्पांना स्वस्त दरात कर्ज दिले जाईल. यामुळे अतिरिक्त 1670 किलो लिटर पेट्रोल तयार होईल.