कोरोनामुळे मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा धोका
नवी दिल्ली/दि. २६ – कोरोनाचा संसर्ग कमी झाला आणि त्याची लस आली, तरीही या रोगाचा कित्येक वर्षे परिणाम होईल. विशेषत: मुलांच्या शारीरिक विकासावर याचा सर्वाधिक परिणाम होईल. मुलांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढू शकते आणि त्यांचे शिक्षण अर्धवट सोडले जाऊ शकते.
विज्ञान व पर्यावरण केंद्र (CSE) च्या भारताच्या पर्यावरण 2020 च्या वार्षिक अहवालात हा दावा केला गेला आहे. सीएसई महासंचालक सुनीता नारायण यांच्यासह देशभरातील 60 हून अधिक पर्यावरणवाद्यांनी एकत्र येऊन हा अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार, भारत आता ‘साथीच्या पिढी’ मध्येप्रवेश करणार आहे. 37 कोटी मुलांवर कोरोनाचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुलांचे वजन कमी होणे, उंची न वाढणे, प्रतिकारशक्ती कमी होणे आदी परिणामांना मुलांना सामोरे जावे लागू शकते. जगभरात पन्नास कोटींबून अधिक मुलांनी शाळा सोडली आहे. यातील निम्म्याहून अधिक मुलेभारतातील आहेत.
सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण म्हणतात, की कोरोना साथीमुळेआपल्यापुढेकाय संकट ओढवून ठेवले आहे, याचा विचार करावा लागेल. कुपोषण, गरिबी आणि शैक्षणिक अपयशानेएका पिढीचेनुकसान आपण करीत आहोत. सीएसईच्या अहवालात म्हटले आहेकी, संपूर्ण टाळेबंदी करूनही भारत संसर्गमुक्त राहिला नाही. लोकसंख्येचा एक मोठा भाग झोपडपट्ट्यांमध्येआणि दाट लोकवस्ती असलेल्या भागात राहतो. ना पिण्याचेशुद्ध पाणी उपलब्ध आहे ना स्वच्छता व्यवस्थित केली जात आहे. अशा परिस्थितीत संसर्गपसरविण्यास नेहमीच वाव असतो.