मराठी

गुजरातमध्ये रोपॅक्स फेरी सेवा सुरू

समुद्रमार्गांनी वाहतुकीचे अंतर होणार कमी; मंत्रालयाचे नाव बदलले

सुरत दि ८ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील सुरत आणि सौराष्ट्र दरम्यान रोपॅक्स फेरी सेवांचे उद्‌घाटन केले. या वेळी मुख्यमंत्री विजय रुपाणी उपस्थित होते. ही फेरी सेवा सुरू झाल्यानंतर लोकांना सौराष्ट्रातील सुरतपासून भावनगरच्या घोघापर्यंतचा मार्ग वापरण्यासाठी खुला झाला आहे.

घोघा ते हजिरा दरम्यान रस्त्याने अंतर 375 किलोमीटर आहे. हे अंतर कापण्यासाठी पूर्वी दहा-बारा तास लागायचे, याचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले, की रोपॅक्स सेवा झाल्यानंतर हे अंतर केवळ 90 किलोमीटरपर्यंत इतके कमी होईल. आता हा प्रवास तीन-चार तासांतच होईल. गुजरातमध्ये रोपॅक्स फेरी सेवेसारख्या सुविधा विकसित करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. या मार्गात अनेक अडचणी आल्या आहेत. मी त्या सर्व सहकार्यांचे, सर्व अभियंत्यांचे, कामगारांचे आभार मानतो, ज्यांनी धैर्य बाळगले. आज गुजरातमधील सागरी व्यवसायाशी संबंधित पायाभूत सुविधा आणि क्षमता वाढीचे काम जोरात सुरू आहे. गुजरात मेरीटाईम क्लस्टर, गुजरात मेरीटाईम युनिव्हर्सिटी, भावनगर येथील सीएनजी टर्मिनल आदी अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

घोघा-हुंडा दरम्यान रोपॅक्स फेरी सेवा लवकरच सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे सांगून मोदी म्हणाले, की या प्रकल्पासमोर निसर्गाशी संबंधित अनेक आव्हाने आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गुजरात मेरीटाईम युनिव्हर्सिटी ही सागरी व्यापार, प्रशिक्षित मनुष्यबळ, तज्ज्ञ तयार करण्यासाठी एक मोठे केंद्र आहे. आज सागरी कायदा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कायद्यापासून सागरी व्यवस्थापन, नौवहन व रसदशास्त्रातील एमबीएपर्यंत सुविधा आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या एका भागापासून दुस-या देशात जाण्यासाठी लागणा-या किंमतीचा खर्च आज इतर देशांपेक्षा आपल्या देशात जास्त आहे. जलवाहतुकीमुळे प्रवासाचा खर्च कमी होऊ शकतो. म्हणून आमचे लक्ष असे एक परिसंस्था तयार करणे आहे, जिथे मालवाहतूक अखंडपणे चालू शकते.

  • वाहतुकीत पायाभूत सुविधा निर्माण करणार

लॉजिस्टिक्सवरील खर्च कमी करण्यासाठी देश आता मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीकडे वेगाने जात आहे. रस्ता, रेल्वे, हवाई वाहतुकीत पायाभूत सुविधा  निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. जहाजबांधणी मंत्रालयाचे नाव बदलले असून आता हे मंत्रालय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय म्हणून ओळखले जाईल

 

Related Articles

Back to top button