मराठी
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई/दि.१८- कोरोनाच्या संकटामुळे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांत आटोपते घेण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारला याचा फटका बसू लागला असून अधिवेशनानंतर आमदारांना कोरोनाचा धोका उद्भवू लागला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
कागलचे राष्ट्रवादीचे आमदार आणि ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनीच याची माहिती ट्विटवर दिली आहे. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे. असे आवाहन त्यांनी केले आहे. कोल्हापूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.