मराठी

रशियाच्या लसीची भारतात चाचणी

सामान्य नागरिकांना लस द्यायला प्रारंभ

मॉस्को/दि.८ – रशियाची(RUSSIA) कोरोना विषाणूची लस(CORONA VACCINE) स्पुटनिक व्ही(SPUTNIK V) ही सामान्य नागरिकांना देण्यात आली आहे. रशियाने गेल्या महिन्यात ही लस मंजूर केली होती. त्यानंतर जगभरातील, विशेषत: पाश्चात्य देशांमध्ये या लसीची चौकशी केली गेली. लॅन्सेट नावाच्या वैज्ञानिक नियतकालिने स्पुटनिक व्ही या लसीच्या दर्जावर शिक्कमोर्कब केल्याने तिची मागणी वाढली आहे. भारतात या लसीच्या चाचण्या होणार आहेत. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की लवकरच लसीचे वितरण प्रादेशिक आधारावर सुरू केले जाईल. स्पुटनिक-व्ही ‘गमालय नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी फॉर रशिया‘ आणि ‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड‘ (RDIF) यांनी विकसित केली आहे. स्पुटनिक व्ही लसीच्या पहिल्या तुकडीने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय उपकरणाच्या नियामकांची आवश्यक गुणवत्ता चाचणी पार केली आहे आणि प्रथम तुकडी नागरी परिसंचरणात सोडण्यात आली आहे, असे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोरोनावरील स्पुटनिक-व्ही या लसीची क्लिनिकल चाचणी या महिन्यात भारतात सुरू होणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वत: कोरोना लस तयार करण्याची घोषणा केली. रशियन राजधानीतील बहुतेक रहिवाशांना काही महिन्यांत कोरोनो विषाणूची लस दिली जाईल. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार रशिया लवकरच देशाच्या इतर भागात लसीची पहिली तुकडी पुरवण्याच्या विचारात आहे. या महिन्यात भारतासह अनेक देशांमध्ये रशियन लसीची क्लिनिकल चाचणी सुरू होणार आहे. या महिन्यात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फिलिपिन्स, भारत आणि ब्राझील येथे क्लिनिकल चाचण्या सुरू होतील, असे रशियन ‘डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रायव यांनी सांगितले. फेज तिसरा चाचणीचा प्राथमिक निकाल ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये जाहीर केला जाईल.

Related Articles

Back to top button