पुणे दी ७ – छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने विकल्या जाणाऱ्या बिडीचे नाव बदलावे, या मागणीसाठी शिवभक्त आंदोलन करत आहे. अखेर आज शिवभक्तांच्या संतापाचा उद्रेक झाला. शिवभक्तांनी बिडी घेऊन जाणारे ट्रक फोडले. पुरंदर किल्याच्या पायथ्याशी शिवभक्तांनी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक संघटना पुढे सरसावल्या आहे. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजी बिडी घेऊन जाणाऱ्या ट्रकची तोडफोड करण्यात आली. संभाजी बिडीचे नाव बदला नाही, तर दहा दिवसात कंपनी पेटवून देऊ, असा इशारा मराठा आरक्षण कृती समितीने दिला आहे.