मराठी

शिवप्रेमींच्या रेट्यामुळे संभाजी बिडीचे नाव बदलणार

कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी सांगितले

पुणे/दि. १० – संभाजी बिडीचे नाव अखेर बदलण्यात येणार आहे. या बिडीचे उत्पादन करणार्या साबळे-वाघिरे ग्रुपने हा निर्णय घेतला आहे; मात्र नाव बदलण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन, इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असे साबळे-वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी सांगितले. संभाजी बिडीचे नाव बदलावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून शिवधर्म फाउंडेशन आणि काही राजकीय संघटनांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलन सुरु केले आहे. तिथे उपोषणही सुरू होते. त्यात कंपनीच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. या आंदोलनाला यश आले असून संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे-वाघिरे कंपनीने घेतला आहे.

Back to top button