सॅमसंगच्या उपाध्यक्षांना लाचखोरीबद्दल शिक्षा
नवी दिल्ली दि १८ – सॅमसंग इलेयट्रॉनिक कंपनीच्या उपाध्यक्षांना लाच देण्याच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना अटक करून तुरूंगात पाठविण्यात आले. या प्रकरणात प्रथम 2017 मध्ये फिर्याद नोंद झाली होती. सोमवारी न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सॅमसंगचे उपाध्यक्ष ली जा-योंग यांना अडीच वर्षाची शिक्षा ठोठावली. योंग यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष पार्क ग्वेन-हे यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी लाच दिल्याचा आरोप होता. या प्रकरणात, सॅमसंगचे माजी अध्यक्ष पार्क जियुनदेखील सामील आहेत. न्यायालयाने या दोघांनाही तुरूंगात पाठविण्याचे आदेश दिले आहेत. वडिलांच्या निधनानंतर 2014 मध्ये योंग यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली. सेऊल उङ्ख न्यायालयाने हा निर्णय दिला तेव्हा ली न्यायालायत हजर होते. न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच त्यांना अटक करण्यात आली.
योंग बरेच दिवस तुरूंगाच्या बाहेर होते. त्याचे कारण त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती. 52 वर्षीय लीवर प्रथम फेब्रुवारी 2017 मध्ये आरोप दाखल केले होते. त्यांच्यावर 27.4 दशलक्ष डॉलर (सुमारे 200 कोटी रुपये) लाच दिल्याचा आरोप होता. 2017 मध्ये त्यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली; परंतु उङ्ख न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्यांची सुटका झाली. योंग यांच्यावर कंपनीच्या फायद्यासाठी अनेक मोठ्या लोकांना लाच दिल्याचा आरोप होता. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष पार्क ग्वेन-हे यांचे नावदेखील त्यात उघड झाले. महाभियोगाने त्यांना पदावरून काढून टाकले. न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये म्हटले आहे, की ली यांनी सक्रियपणे लाच दिली आणि राष्ट्रपतींना त्यांचा व्यवसाय चालविण्यास मदत करण्याच्या शक्तीचा गैरवापर करण्यास सांगितले. न्यायालयाने म्हटले आहे, की देशातील सर्वोङ्ख कंपनी सॅमसंग राजकीय सत्तांतर होते, तेव्हा कंपनीच्या हितासाठी कायम लाचखोरी करते. हे दुर्दैवी आहे.