मराठी

कोरोना योद्धा पुरस्काराने संजय आठवले सन्मानित

अमरावती(प्रतिनीधी ) दि १४ – लाईफ डेव्हलपमेन्ट सोसायटी च्या वतीने कोरोना महामारी मध्ये जनता मोठ्या प्रमानात भयभीत झाली होती, नागरिका मध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाले होते , जनतेचा हाताला काम नसल्यामुळे कौटुंबिक उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते ,कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती ,अश्या विकट परिस्थिती मध्ये सुप्रसिद्ध समाजसेवक संजय आठवले यांनी जीवाची पर्वा न करता नागरिकांना दवाखाना मध्ये उपचार करण्यासाठी दाखल केले. गरिबांना अन्नधान्याचा पुरवठा केला ,  संकटात  सापडलेल्यांना त्यांच्या मूळ गावी  घरी सुखरूप पोहचून दिले .इत्यादीप्रकारे साधन सुविधा व सुरक्षा समाज सेवक संजय आठवले यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत , त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेची दखल घेऊन लाइफ डेव्हलपमेंट सोसायटी चे   वतीने  माजी लेडी गव्हर्नर डॉ.कमलाताई गवई हरीना फाउंडेशनचे चंद्रकांत पोपट , प्रा विजय राऊत  संचालक ऍनिमेशन कॉलेज  ऑफ बायो इंजिनीअरिंग,  रोमी बिंदर, राजस्थान रॉयल आयपीएल  टीम मॅनेजर,  नितीन कदम,उद्योजक  डॉ श्यामसुंदर निकम  जिल्हा शल्य चिकित्सक ,संतोष बद्रे मनसे प्रमुख,  प्रमोद कुमार अध्यक्ष लाइफ डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुप्रसिद्ध समाजसेवक संजय आठवले यांचा कोरोना महामारी मध्ये उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल कोरोना योद्धा सेवा पुरस्कार देऊन संजय आठवले यांना  सन्मानित करण्यात आले आहे.लाइफ डेव्हलपमेंट सोसायटी चे अध्यक्ष प्रमोद कुमार , सचिव नरेंद्र गुलदेवकर , दिनेश हिवराळे , मिथिल कळंबे ,कल्याणी गुलदेवकर , इत्यादींनी कोरोना योद्धा सेवा पुरस्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले आहे .

Related Articles

Back to top button