मराठी

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना किशोर तिवारी यांचे पुन्हा खुले पत्र

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपचा पराभव मोदी विरूध्द  जनमत –किशोर तिवारी 

यवतमाळ दि १४ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांना शेतकरी नेते वमहाराष्ट्राच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे राज्य मंत्री दर्जा प्राप्तअध्यक्ष किशोर तिवारी यांनी पुन्हा एक खुले पत्र लिहीले आहे. या पत्रात महाराष्ट्रआणि उत्तर प्रदेशमधील पदवीधर व शिक्षक मतदारसंघात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव म्हणजे पंतप्रधान नरेन्द मोदीविरूध्द जनमत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे किशोर तिवारी यांनी मोदीजींच्या कारभारावरून सहा ज्वलंत प्रश्न या प्रत्रात उपस्थित केल्याने  पुन्हाएकदा राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. परंपरागत मतदार संघात सुसंस्कृतशिक्षित लोकांत झालेला दारुण पराभव म्हणजे मोदी यांचे धोरणाविरोधात एकव्यापक लाट दिसून येत असल्याचे तिवारी यांनी सप्रमाण विशद केले आहे.
आपल्या मुद्देसूद पत्रात तिवारी यांनी म्हंटले आहे की राष्ट्राच्या आणि विशेषत:महाराष्ट्र आणि आता उत्तर प्रदेश राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवरगेल्या दोन वर्षातील हे त्यांनी डॉ मोहन भागवत यांना लिहिलेले ५ वे पत्र आहे. पत्रपुढे म्हणते की “आपण माझी मते किंवा ही पत्रे सार्वजनिक करण्याच्या माझ्याहव्यासाशी सहमत किंवा सहमतही होऊ शकणार नाही, परंतु संघाचा एक जुनास्वयंसेवक म्हणून आपल्या भारत मातेप्रती असलेले राष्ट्रीय हित आणि कर्तव्यम्हणून हा माझा प्रपंच व प्रयत्न असतो, जेणे करून सर्व सामान्य लोकांच्या आणिस्वयंसेवकांच्या भावना आपणा पर्यंत आणि सर्व समाजा समोर ठेवूनच व्यापक सर्वसमावेशक चर्चा होवू शकते. म्हणून कुणीही माझ्या या प्रयासास अन्यथा घेवू नये.आज हे पत्र लिहिण्याचे कारण अत्यंत गंभीर आणि आवश्यक आहे. नुकत्याच पारपडलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकाला मधे उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यादोन प्रमुख राज्यांमध्ये आपला व्यापक जनाधार असलेल्या सुशिक्षित पदवीधर वशिक्षक मतदारांच्या तीव्र भावना प्रतिबिंबित झाल्याबद्दल, सर्व संघ स्वयंसेवकआश्चर्यचकित झाले आहेत. यातील विशेष संदर्भ हा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ वाराणसी – (बनारस), अलाहाबाद-झांसी, गोरखपूर (उत्तर प्रदेश) – नागपूर, पुणे,औरंगाबाद आणि अमरावती (महाराष्ट्र), इ. ठिकाणी झालेल्या पानिपताशी आहे ”
तिवारी यांनी कटाक्ष साधताना पुढे लिहिले आहे की भारतीय जनसंघाच्या अगदीसुरुवातीच्या काळापासून हे सर्व विधान परिषद मतदार संघात परंपरागत पनेनिवडल्या गेलेल्या संघ परिवार स्वयंसेवकांचा महान इतिहास आणि त्यांची परंपराप्रत्येकाला लक्षात घ्यावी लागेल. या पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद जागांद्वारेस्वयंसेवकांचा विधिमंडळात प्रवेशाचा पूर्वी एकमेव मार्ग असायचा. उत्तर प्रदेश आणिमहाराष्ट्रातील उच्च सदनात या महत्वपूर्ण जागा भाजपने गमावल्या आहेत आणि तेदेखील केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूपी मधील मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ जी यांच्या सरकार समक्ष आणि महाराष्ट्रातही, नागपुरातील सर्वातमजबूत संघ आणि नेटवर्क असल्यानंतर ही ! वाराणसी, अलाहाबाद-झांसी आणिगोरखपूरमध्ये भाजपाचे राज्य सरकार आणि नागपूर संघ मुख्यालयाची जागाआणि पुणे आणि अमरावती येथील दोन्ही जागा केंद्रीय आणि राज्य भाजपक्षांच्याघटकांना भारी झटका आहेत.  हे पदवीधर आणि शिक्षक हे विचारवंत घटक आहेत.म्हणून हे एक प्रकारे, आपण हे समजून घेतले पाहिजे की हे एक “मिनी जनमत”यूपी व महाराष्ट्राच्या सुमारे ६० लाखांहून अधिक लोकांची संख्या असलेल्यासमाजातील अत्युत्तम वर्गाच्या भावनांचा नमुना सर्वेक्षण आहे. तिवारी यांनी पुढेम्हंटले आहे की माझ्या नम्र मते, हे एक आव्हान आहे, कारण हे मतदार भारतीयसमाजा चा सुसभ्य वर्ग आहेत – सुशिक्षित आणि सुजाण सुधारक, तसेच कर देणारेजे नेहमीच संघ-भाजपला पाठिंबा देत आले आहेत. ते दूर जाणे फार चिंतेचे कारणजरूर असावे. यावर व्यापक मंथन हवेच असेही ते म्हणाले. या भारी दारुणपतनास “सामान्य पराभव” मानले जाऊ शकत नाही, यदपी भाजपच्या मीडियाव्यवस्थापकांनी जातीय रंग देवून खरे कारण दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे,परंतु काही महत्त्वपूर्ण प्रश्न उभे राहतात , ते पुढील प्रमाणे : १. या सर्वात मोठ्या ६०लाख बुद्धिजीवी सॅम्पल सर्वेक्षणातून प्रतिबिंबित झाल्यानुसार भारतीय समाजातीलपदवीधर व शिक्षक या बुद्धिजीवी समाजाचा विश्वास आणि भरोसा भाजपाने गमावलाआहे काय ? २. सुशिक्षित गरीब / मध्यमवर्गीय घटकांना पोळणारी पंतप्रधानांचीधोरणे आणि मोठे आर्थिक संकट याचा हा परिणाम आहे का ? ३. पंतप्रधान मोदीपासून मोठ्या लोकसंख्येच्या वर्गाचा हळूहळू मोह भंग झालेला असूननिष्कर्षांशिवाय उंच, पोकळ दावे, विरोधाभासी विधानांमुळे जनता आता कंटाळलीआहे ? ४.  भाजप केवळ अंबानी / अदानी इत्यादी मोठ्या भांडवलदारांना /कॉर्पोरेट्सना मदत करत असल्याच्या संदेशामुळे पंतप्रधानांच्या प्रतिमेला मोठे ग्रहणलागले आहे काय ?  ५. खासकरुन कोविड (साथीच्या) साथीने ज्या पद्धतीने हाताळलेगेले होते, त्या नंतर सामान्य जनतेला वेठीस धरून ते बरबाद होताना आपण मुकदर्शक झालो होतो काय ? ६. पंतप्रधानांच्या तथाकथित ‘जादू’ने देशाला अपयशीठरवले आहे – विशेषत: मुक – कट्टर धर्मनिरपेक्ष हिंदू, ज्यांनी आतापर्यंतजातीयतेवरील आणि लोकसंख्येच्या घटकांना लक्ष्य बनविणाऱ्या ‘लव्ह-जिहाद’सारख्या अत्यंत जातीयवादी फूट पाडणा धोरणांचा पाठपुरावा केला नाही, ते आताजातीय धर्मांध शक्तींना कंटाळून भाजपला धडा शिकवत आहेत काय ? या प्रश्नावरचर्चा करावीच लागेल ! या पैलूंचे मूल्यांकन केले पाहिजे आणि संघ परिवार- थिंकटँक मध्ये गंभीरपणे विचार झाले पाहिजेत, अन्यथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाभाजपावरील प्रभाव नाहीसा  होऊन एक बेछूट बेलगाम उन्माद माजण्याचा प्रकारघडेल, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

 

 

Related Articles

Back to top button