वरुड/दि. १९ – आज दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे शनिवार पेठ परिसरामध्ये पडलेल्या एका झाडामुळे शनिवार पेठ सह शहरातील विविध भागातील विजपुरवठा बंद असल्याने नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागण्याची वेळ आली आहे. दरम्यान शहरात दोन घरे पडल्याने दोन्ही कुटूंबांना आता उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे.
प्राप्त माहीतीनुसार, आज दुपारी २ च्या सुमारास अचानक वादळी पाऊस सुरु झाला. पावसासोबतच वादळ सुध्दा मोठ्या प्रमाणात असल्याने शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी झाडे उन्मळुन पडली. त्यामुळे विविध रस्ते काही वेळाकरीता बंद होती. शहरातील शनिवार पेठ परिसरामध्ये रस्त्यावरील झाड विद्युत खंाब आणि विद्युत पुरवठ्यावर उन्मळुन पडली. सुदैवाने या परिसरामध्ये मोठी दुर्घटना घडली नाही. जोरदार वा:यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान सुध्दा झाल्याचे कळते. पाऊस सुरु असतांना अचानक विद्युत पुरवठा बंद झाला आणि तेव्हापासून शनिवार पेठसह इतर भागातील विद्युत पुरवठा बंदावस्थेत आहे. ११ केव्ही पुरवठा करणा:या विद्युत तारेवर हे झाड पडल्यामुळे आणि काही विद्युत खांब उन्मळुन पडल्यामुळे आज रात्री आणि उद्या दिवसभर विद्युतपुरवठा बंद राहणार असून उद्या सायंकाळपर्यंत विजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न असल्याचे वरुड उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता अलोने यांनी सांेिगतले.
दरम्यान शहरातील बबनराव इंगळे व धनराज शेवतकर यांचे घर वादळी वारा आणि पावसामुळे पडल्याने हे दोन्ही कुटूंबे उघड्यावर आली आहेत. याबाबत माहीती मिळताच तलाठी डी.बी.मेश्राम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन तहसिलदार यांचेकडे सादर केला आहे.