मराठी

अधिका-यांच्या बदल्यात घोटाळा

सीआयडी चौकशीची भाजपची मागणी

मुंबई/दि.१३ – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर बदली घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी १५ टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाèयांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे, असा आरोप करतानाच या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्य सरकारने कोरोनामुळे बदल्या रोखल्या होत्या; पण नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठविली. परिणामी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला. यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली. तसेच ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा अधिकारी व कर्मचाèयांवर अन्याय झाला. या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची गरज आहे, असे सांगतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त खात्याने बदल्या करू नयेत, असा आदेश दिला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठवली, हे आश्चर्यकारक आहे, असे ते म्हणाले.

कोरोनाविषयीच्या उपाययोजनात सातत्य राखण्यासाठी चालू वित्तीय वर्षात बदल्या करू नयेत, असे सरकारचे मे महिन्यात धोरण होते, तर जुलै महिन्यात राज्यातील कोरोनाची साथ अधिक गंभीर झाली असताना एकूण कार्यरत पदांच्या पंधरा टक्के बदल्या करण्याचा आदेश देण्याचे कारणच नव्हते. तसेच नंतर त्याला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचेही कारण नव्हते. राज्य सरकारच्या या धोरणातील गोंधळामुळे कोरोनाचे संकट असताना मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाèयांना त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर करण्याची वेळ आली. कोरोनामुळे शाळा बंद असताना मुलांसाठी नव्या ठिकाणी शाळेत प्रवेश मिळविण्याचे आव्हानही निर्माण झाले. कोरोनाची साथ रोखण्याच्या प्रयत्नांमध्येही अडथळा आला, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button