मराठी

काश्मीरमध्येसुरक्षा दल हाय लर्टवर

श्रीनगर/दि. २२ – अनंतनागसह संपूर्णभागात सुरक्षा दलांच्या तैनातीत वाढ करण्यात आली आहे. श्रीनगरमधील कृष्णा ढाब्यावर हल्ल्याच्या कट रचणार्‍याला अटक झाल्यानंतर पोलीस आणि सैन्यानेअनंतनागच्या जंगलात दहशतवाद्यांचे लपलेलेठिकाण उघडकीस आणलेआहे. या संयुक्त कारवाईत सुरक्षा दलांकडून अनंतनागच्या जंगलातून तीन एके-56 रायफल, दोन चिनी पिस्तुल, दोन चिनी ग्रेनेड, एक दुर्बिणी, सहा एकेमॅगझिन आणि इतर अनेक वस्तूजप्त करण्यात आल्या आहेत.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवादी घटनांमध्येवाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन खोर्‍यात सुरक्षा वाढवली आहे. पोलीस आणि सैन्यानेसंयुक्त कारवाईकरून अनंतनागच्या जंगलातून मोठ्या प्रमाणात शस्त्रेजप्त केली आहेत. उंच इमारतींवर स्निपर तैनात केलेजातील. काश्मीरचेपोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचेआदेश जारी केलेआहेत. तेम्हणालेकी, काश्मीरमधील सर्वउंच इमारतींवर स्निपर तैनात करण्यात आलेआहेत. कायमस्वरुपी बंकरदेखील बदललेजात आहेत. या व्यतिरिक्त संपूर्ण खो-यात दहशतवादविरोधी कारवाया अधिक तीव्रकरण्यात येतील, जेणेकरुन दहशतवाद्यांना वेळीच पकडता येईल. दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमधील बाजारपेठेत पोलिसांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. येथील बगत बरजुला भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर एके -के 47 मधून स्वैरपणेगोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस ठार झाले.

Related Articles

Back to top button